Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, त्याची चुकीची प्रतिमा तयार केली; ममता कुलकर्णींच्या वादग्रस्त विधानाने खळबळ


दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, त्याची चुकीची प्रतिमा तयार केली; ममता कुलकर्णींच्या वादग्रस्त विधानाने खळबळ


बॉलिवूडमधून बाहेर पडून साध्वी बनलेली ममता कुलकर्णी या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.आता त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल एक विधान केले आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोरखपूरमध्ये पत्रकार परिषदेत ममता कुलकर्णीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेताना तो दहशतवादी नसल्याचे म्हटले आहे.

ममता कुलकर्णी पुढे म्हणाल्या की दाऊदचे नाव बॉम्बस्फोटासारख्या कोणत्याही कटात कधीही नव्हते. मीडिया आणि काही राजकीय शक्तींनी वर्षानुवर्षे दाऊदचे चुकीचे वर्णन केले आहे.ममता बाबा गोरखनाथांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी गोरखनाथ मंदिरात गेल्या होत्या. ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील धाडसी भूमिका आणि हिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ममता आता आध्यात्मिक जीवन जगत आहेत.

अभिनेत्री ते साध्वी

प्रयागराज महाकुंभातील किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदासाठी उमेदवारी मिळाल्यामुळे ममता कुलकर्णी चर्चेत होत्या. पण नंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. दोनच दिवसांनी, त्यांना महामंडलेश्वर म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आले.त्यांनी त्यांच्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ममता कुलकर्णीचे नाव आता यमाई ममता नंद गिरी झाले आहे. ममता म्हणाल्या, "मला या पदावर पुन्हा नियुक्त केल्याबद्दल मी माझ्या गुरूंची आभारी आहे. मी माझे जीवन किन्नर आखाडा आणि सनातन धर्मासाठी समर्पित करेन."

बॉलीवूड सोडल्यानंतर ममताचे दुबईत वास्तव्य

बॉलीवूड सोडल्यानंतर ममता दुबईत राहत होत्या. गेल्या वर्षी त्या २५ वर्षांनंतर दुबईहून भारतात परतल्या. त्यानंतर त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. प्रयागराज महाकुंभादरम्यान, किन्नर आखाड्यातून दीक्षा घेतली आणि ती साध्वी बनल्या. पिंडदान आणि पट्टाभिषेक महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी केले.ममता यांना महामंडलेश्वर पद देण्यात आले. तथापि, काही दिवसांतच त्यांना विरोधाचा सामना करावा लागला आणि राजीनामा दिला. नंतर त्यांनी पुन्हा हे पद मिळवले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.