नाशिकमधील १२ पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होतं. बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यासंदर्भात शहरातील भाजपच्या तीन आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेतली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने या विरोधात मोठा मोर्चा काढला होता तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही शक्तीप्रदर्शन केलं होतं.
पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर
नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. शहरातील १२ पोलीस ठाण्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून यामध्ये ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शहरातील भाजपच्या तीन आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली होती.तसंच नंतर तिन्ही आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी १२ पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. मात्र, या बदल्यानंतर तरी शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस दलाला यश येताय का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सहा महिन्यात ४२ खून
नाशिक शहरात गेल्या सहा महिन्यात 42 खून झाले आहेत. गुन्हेगारी टोळ्यांकडून दहशत वाढवण्यासाठी वाहनांची तोडफोड आणि मारहाणीच्या घटना वाढल्या होत्या. अंमलीपदार्थांची विक्री हा देखील मोठा गंभीर विषय़ ठरला होता. याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठा मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं. तसंच जर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात न आणल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या बदल्या झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
कोणाकडं कुठली दिली जबाबदारी?
पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड (अंबड पोलीस ठाण्यातून गंगापूर पोलीस ठाण्यात )पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग नवलसिंग राजपूत (गंगापूर पोलीस ठाण्यातून अंबड पोलीस ठाण्यात)पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे (अंबड पोलीस ठाण्यातून इंदिरानगर पोलीस ठाण्यात)पोलीस निरीक्षक प्रकाश आत्माराम अहिरे (भद्रकाली पोलीस ठाण्यातून सातपूर पोलीस ठाण्यात)पोलीस निरीक्षक उमेश नानाजी पाटील (सायबर पोलीस ठाण्यातून आडगाव पोलीस ठाण्यात)पोलीस निरीक्षक संतोष बबनराव नरुटे (मुंबई नाका पोलीस ठाण्यातून चुंचाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात)पोलीस निरीक्षक रणजित पंडीत नलवडे (सातपूर पोलीस ठाण्यातून विशेष गुन्हे शाखेत)पोलीस निरीक्षक संजय मारुती पिसे (आडगांव पोलीस ठाण्यातून सायबर क्राईम पोलीस ठाण्यात)पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील (एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीतून मुंबई नाका पोलीस ठाण्यात)पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे (इंदिरानगर पोलीस ठाण्यातून नाशिक शहर वाहतूक शाखेत)पोलीस निरीक्षक तुषार मुरलीधर अढाव (शहर वाहतूक शाखेतून सातपूर पोलीस ठाण्यात)पोलीस निरीक्षक रियाज ऐनुद्दीन शेख (सातपूर पोलीस ठाण्यातून शहर वातूक पोलीस ठाण्यात)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.