Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मी जर तोंड उघडले, तर मातोश्री कापेल, मोठा हादरा बसेल " - रामदास कदम

"मी जर तोंड उघडले, तर मातोश्री कापेल, मोठा हादरा बसेल " - रामदास कदम
 

मुंबई : उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत. ते कपटी आहेत. मी 54 वर्षे शिवसेनेत घालवली आहेत, मी का खोटे बोलणार? उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल, तर त्यांनी समोर येऊन सांगावे की मी जे बोलतोय, ते खरे नाही. जर मी तोंड उघडले, तर उद्धव ठाकरेंची खूप अडचण होईल आणि त्यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर येईल, अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

कालच्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाला दोन दिवस तसेच ठेवले आणि त्यांच्या हाताचे ठसे घेतले, असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी काल केला होता. या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्यांकडून तीव्र प्रत्युत्तर देण्यात आले. रामदास कदम यांच्यासारख्या व्यक्तीला आता काही किंमत राहिली नसल्याने असे वक्तव्य ते करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली. यावर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व टीकांचा चांगलाच समाचार घेतला आणि उद्धव ठाकरेंवर आणखी गंभीर आरोप केले.

"अंबादास दानवे यांच्यासारख्या लोकांना मी आमदार केले आणि आता ते माझ्यावर टीका करत आहेत. अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे मी लक्ष देत नाही. मी 54 वर्षे शिवसेनेत घालवली आहेत, मी का खोटे बोलणार? जर माझ्या बोलण्यात काही तथ्य नसेल, तर उद्धव ठाकरेंनी समोर येऊन माध्यमांसमोर ते सांगावे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे. दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या मृतदेहाचा छळ उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, सत्य समोर येईल. उद्धव ठाकरेंनी आपल्या बछड्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की असे काही घडले नाही," अशी टीका रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. 
 
पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले. शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवण्यास मी उद्धव ठाकरेंना सांगितले होते, पण त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या हाताचे ठसे का घेतले, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावे, असे रामदास कदम म्हणाले. शिवसेनेच्या एका महिला उपनेतेचा उद्धव ठाकरे छळ करत होते, असा आरोपही रामदास कदम यांनी केला. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्याची उद्धव ठाकरेंची सवय आहे. दोन दिवस बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवाजवळ उद्धव ठाकरेंनी कोणालाही जाऊ दिले नाही. स्वतः शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले होते की बाळासाहेबांच्या मृतदेहाचा छळ करू नका. पण शरद पवारांनाही साहेबांच्या पार्थिवाजवळ जाऊ देण्यात आले नाही, असे रामदास कदम यांनी यावेळी सांगितले. "मी जर तोंड उघडले, तर मातोश्री कापेल, मोठा हादरा बसेल," असा इशारा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिला.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.