Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! धार्मिक स्थळांवर नसणार आता भोंगे; आतमध्ये लावावे लागणार स्पीकर, सोलापुरातील १०० धार्मिक स्थळांनी स्वत:हून काढले भोंगे

Breaking News ! धार्मिक स्थळांवर नसणार आता भोंगे; आतमध्ये लावावे लागणार स्पीकर, सोलापुरातील १०० धार्मिक स्थळांनी स्वत:हून काढले भोंगे
 

सोलापूर : सोलापूर शहरात मंदिरे, मशिदी, मदरसा, चर्च, बुद्धविहार अशी ८९३ धार्मिक स्थळे पोलिसांच्या रेकॉर्डला आहेत. त्यातील २५० धार्मिक स्थळांवर परवाना घेऊन भोंगे, स्पीकर लावलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर त्यापैकी १०० धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींनी स्वत:हून भोंगे-स्पीकर काढून घेत, आतील बाजूला लावले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही धार्मिक स्थळांच्या बाहेरील तथा वरच्या बाजूला भोंगे लावता येणार नाहीत. भोंगे लावण्यासाठी यापुढे परवाना दिला जाणार नाही. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांऐवजी आता आवाजाची मर्यादा पाळून स्पीकर लावावा लागणार असून, तोही आतील बाजूलाच असणार आहे. तत्पूर्वी, शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या हद्दीतील धार्मिक स्थळांचे ट्रस्टी, मौलवी, पुजाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या.

त्या बैठकीत पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर अनेकांनी धार्मिक स्थळांवरील भोंगे स्वत:हून काढण्यासाठी सकारात्मकता दर्शवत ते काढूनही घेतले आहेत. विनापरवाना भोंगे किंवा स्पीकर लावून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई देखील केली जाणार आहे. यापूर्वी अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.

सोलापूर शहरातील धार्मिक स्थळे

एकूण

८९३

परवानाधारक भोंगे-स्पीकर

२५०

स्वत:हून काढून घेतलेले भोंगे

१००

आतमध्ये लावलेले स्पीकर

५२

धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींसमवेत सोमवारी बैठक
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही धार्मिक स्थळांवर भोंगा किंवा मोठ्या आवाजाचा स्पीकर लावता येणार नाही. स्पीकर लावण्यासाठी पूर्वी १५ दिवसाला पोलिसांकडून परवाना घ्यावा लागत होता. त्यात बदल करून आता तो तीन महिन्यांसाठी दिला जाणार आहे. पण, आता अट फक्त एवढीच आहे की तो स्पीकर धार्मिक स्थळाच्या आतील बाजूला लावावा लागणार आहे. यासंदर्भात सोमवारी (ता. ६) सकाळी १० वाजता सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींसमवेत पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांची आयुक्तालयात बैठक होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.