सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर बुट फेकण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने क्षणभरात खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीशांवर बुट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाची संपूर्ण कुंडली समोर आली आहे. राकेश किशोर असे सरन्यायाधीशांवर बुट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचे नाव आहे. आरोपी राकेशचं वय हे ६० आहे. त्याने सुप्रीम कोर्टातील बार कौन्सिलमध्ये २०११ साली नोंदणी केली होती. या राकेश किशोरच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोर्टरुममध्ये नेमकं काय घडलं?
सुप्रीम कोर्टात सोमवारी एका प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या सुनावणीदरम्यान वकील राकेश किशोर हे सरन्यायाधीशांजवळ पोहोचले. त्यानंतर संधी मिळताच वकील राकेशन किशोरने सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या दिशेने बूट फेकला. मात्र, वकील राकेशचा बूट सरन्यायाधीश गवईंपर्यंत पोहोचला नाही. त्यानंतर त्याने ओरडत सनातनी धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशी घोषणाबाजी केली.राकेश किशोरच्या कृत्यानंतर कोर्टातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने वकील राकेश किशोरला ताब्यात घेतलं. या वकिलाला तातडीने कोर्टाच्या बाहेर नेण्यात आलं. राकेश किशोरच्या कृत्यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी कोर्टात वकिलांना सुनावणी सुरु ठेवण्याचे आदेश दिले. सरन्यायाधीश गवई यांनी वकिलांना पुढे सांगितलं की, 'तुम्ही या गोष्टीने विचलित होऊ नका. मला या गोष्टीने कोणताही फरक पडत नाही'.
आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'सनातन का अपमान नहीं सहेंगे...एक सडक्या मनोप्रवृत्तीचा सुप्रीम कोर्टातला वकील जोरजोरात ओरडतो आणि थेट माननीय मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने चप्पल फेकतो. जेव्हा शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात सरन्यायाधीश आले होते, तेव्हा तर थेट राज्य सरकारने प्रोटोकॉल दिला नाही. या घटना कसल्या द्योतक आहेत. ढासळणाऱ्या मानसिकतेच्या आणि एक सनकीं डोक्याने भरलेल्या ज्वराचा...'.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.