पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाला काही दिवसांपूर्वी लंडन रिटर्न आणि पीएचडी आणि युपीएसीची परिक्षा उत्तीर्ण भामट्याला महाविद्यालयाची तब्बल अडीच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केल्याचे समाोर आले होते. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी IPS
अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. या
दोन्ही महिलांवर फसवणूक करून हजारोंची पायताणं म्हणजे चप्पला चोरल्याचा
आरोप आहे. विशेष म्हणजे हा फसवणुकीचा प्रकार पुण्यातील अतिशय वर्दळीच्या
असलेल्या जंगली महाराज रस्त्यावर घडला आहे.
नेमकी फसवणूक कशी केली?
फसवणूक करून तब्बल 17 हजारांच्या चपला घेऊन पसार झालेल्या माय-लेकींना लष्कर पोलिसांनी गजाआड केलं असून, मिनाज मुर्तजा शेख (वय 40) आणि तिची मुलगी रिबा मुर्तजा शेख (वय 19, दोघी रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी मायलेकींची नावे आहेत. आरोपी मिनाज शेख आणि तिची मुलगी रिबा एम. जी. रोडवरील एका नामांकित चप्पल दुकानात 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास गेल्या होत्या. घरात लग्नाचा कार्यक्रम असल्याचं सांगत मोठ्या प्रमाणावर चप्पल आणि बुट खरेदी करण्यास सुरुवात केली. त्याेवळी मिनाजने दुकानात स्वतःची आयपीएस अधिकारी म्हणून ओळख सांगत तेथील कर्मचाऱ्यांना बनावट ओळखपत्र दाखवलं.लग्नाचे कारण सांगून या दोघींनी दुकानातून तब्बल 17 हजार रूपयांच्या चपला खरेदी केल्या. मात्र, खरेदी केलेल्या चपलांची रक्कम घेण्यासाठी मिनाजने दुकानातील कर्मचाऱ्याला पैसे देण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल असे सांगत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने 17 हजारांच्या चपला घेऊन पसार झालेल्या माय-लेकींना लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, तपासादरम्यान या दोघींनी यापूर्वीही अशा प्रकारच्या फसवणुक केल्याचे समोर आले आहे. या दोघी शहरातील विविध भागांतील दुकानदारांना लक्ष्य करत असतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आरोपी मिनाज आणि रिबा यांच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात याआधी तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.