Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?
 

हवामान विभागाने दक्षिण भारतातील ५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा 
तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये १२ ऑक्टोबरपर्यंत राहणार पावसाचा जोर
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये होणार मध्यम स्वरूपाचा पाऊस

ईशान्य भारतातदेखील पावसाची शक्यता

दक्षिण भारतात पुन्हा एकदा वातावरण फिरलं आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यात पाच दिवस जोरदार पाऊस बरसणार आहे. तर तीन दिवस गुजरातमधील मध्य भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील काही भाग आणि महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिममध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळमध्ये आठ ते १२ ऑक्टोबरपर्यंत पाऊस कोसळेल. तर कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये १० ऑक्टोबरपर्यंत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस तामिळनाडू, केरळ, तेलंगनामध्ये वादळी वाऱ्याची देखील मोठी शक्यता आहे. कर्नाटकात आठ ऑक्टोबर, लक्षद्वीप, कर्नाटकातील किनारी भागात दोन दिवस पावसाची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशमध्ये पाच दिवस पावसाची शक्यता आहे. रायलसीमामध्ये ८ ते १० ऑक्टोबरपर्यंत विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. उत्तर पश्चिम भारतातील उत्तराखंडमध्ये आठ ऑक्टोबरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पूर्व भारतात गंगानदीजवळील भागात आठ ते १० ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता आहे.
 
पश्चिम बंगाल, सिक्किममध्ये आठ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे. ओडिशामध्ये ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरामध्ये आठ ते १० ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये १० ऑक्टोबरमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील ५ दिवस कुठे कुठे पाऊस कोसळणार?

तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये पाऊस कोसळणार आहे.

महाराष्ट्रात कुठे बरसणार?

महाराष्ट्राच्या दक्षिण-पश्चिम भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.