भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 4 ऑक्टोबर 2025 पासून बँकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल केला आहे. यानंतर चेक क्लिअर होण्यासाठी 1-2 दिवस वाट पाहावी लागणार नाही, आता नवीन फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टम लागू होणार आहे. या सिस्टीममध्ये चेक जमा केल्यावर त्याचे पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होतील.
नवीन सिस्टीम कशी काम करणार?
सध्या चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागतो. परंतु आता RBI ने पूर्ण प्रोसेस सोपी केली आहे.सकाळी 10 ते सायं 4 वाजेपर्यंत जमा झालेले सर्व चेक्स बँक स्कॅन करून त्यांची इमेज आणि माहिती लगेच क्लिअरिंग हाऊसला पाठवेल.क्लिअरिंग हाऊसला ते चेक्स सायं 7 वाजेपर्यंत कन्फर्म करावे लागतील.त्यानंतर चेक क्लिअर होईल.दोन टप्प्यांत होणार अंमलबजावणीटप्पा 1 (4 ऑक्टोबर 2025 - 2 जानेवारी 2026): बँकांना सायं 7 वाजेपर्यंत चेक कन्फर्म करण्याची मुदत असेल.
टप्पा 2 (3 जानेवारी 2026 पासून): बँकांना चेक कन्फर्म करण्यासाठी फक्त 3 तासांचा वेळ दिला जाईल. उदाहरणार्थ, सकाळी 10 वाजता चेक पाठवला असल्यास, तो दुपारी 2 वाजेपर्यंत क्लिअर करावा लागेल. सुरुवातीला ही नवी व्यवस्था दिल्ली, मुंबई, चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लागू होईल आणि नंतर देशभरात याचा विस्तार केला जाईल. यामुळे बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुधारेल आणि चेक लवकर क्लिअर होईल. RBI ने मोठ्या रकमेच्या चेकसाठी Positive Pay System बंधनकारक केली आहे. यात ग्राहकांना चेकचे तपशील आधीच बँकेला द्यावे लागतात, ज्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल आणि चुकीचे चेक आपोआप क्लिअर होणार नाहीत.
ग्राहक आणि व्यवसायांना फायदा
या बदलामुळे ग्राहकांना पैसे लवकर मिळतील, व्यवहारांमधील अनिश्चितता कमी होईल आणि कॅश फ्लो वाढेल. यामुळे बँकिंग क्षेत्राची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढेल. RBI ने ग्राहकांना सल्ला दिला आहे की, चेक भरताना तपशील योग्य लिहावेत आणि खात्यात पुरेशी रक्कम ठेवावी, जेणेकरून चेक डिसऑनर होणार नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.