सांगलीत परमिट बार मध्ये तरुणाचा खून : चाकू जागेवरच टाकून संयिताचे पलायन
सांगली : शहरातील विश्रामबागमधील व्हाईट हाऊस या परमिटबारमध्ये मित्राकडून मित्राचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने बारमध्ये खळबळ उडाली. इतर ग्राहकांनी सर्व काही जागेवर टाकून पलायन केले. निखिल साबळे ( वय 30, रा. कुपवाड ) असे मयत तरुणाचे नाव असून प्रसाद दत्तात्रय सुतार असे संशयित हल्लेखोराचे नाव असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. कोणाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलिसांची दोन पथके हल्लेखोराच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विश्रामबाग मधील शंभर फुटी रोडवर वाईट हाऊस नावाचा परमिट बार आहे. त्या ठिकाणच्या पहिल्या मजल्यावरील बार मधील एका कोपऱ्यात मयत आणि संशयित दोघे मद्यप्राशन करत बसले होते. ते दोघेही एकमेकाचे मित्र असून दोघांचेही सर्व्हिसिंग सेंटर आहे. मयत निखिल साबळे याचे सर्व्हिसिंग सेंटर हॉटेल पालवी च्या परिसरात आहे तर हल्लेखोर प्रसाद सुतार याचे सर्व्हिसिंग सेंटर हॉटेल व्हाईट हाऊसपासून काही अंतरावर आहे. ते दोघेजण रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बारमध्ये आले होते. साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक हल्लेखोर प्रसाद सुतार याने चाकूने निखिल साबळे याचा गळा चिरला आणि चाकू तिथेच टाकून त्याने पलायन केले. त्याने केलेला चाकूचा एकच वार इतका गंभीर होता की त्या ठिकाणी काही क्षणात रक्ताचे थारोळे साचले. काही क्षणातच निखिल साबळे यांचा मृत्यू झाला. बारमध्ये गर्दी आणि गोंधळ सुरू असतानाच खुनाची घटना घडल्याचे समोर येताच अनेकांनी हातातील ग्लास आणि जे काय होते ते तिथल्या तिथे टाकून पलायन केले. काही क्षणात संपूर्ण हॉटेल रिकामा झाले.
हॉटेलमध्ये कोणाची घटना झाल्याची समजतात पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकूण परिस्थितीची पाहणी केल्यानंतर संशयिताचा शोध घेण्यासाठी त्वरित दोन पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.