Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोबाइलवरील चक्री गेममुळे बार्शीच्या तरुणाने संपविले जीवन

मोबाइलवरील चक्री गेममुळे बार्शीच्या तरुणाने संपविले जीवन
 

बार्शी:  कुर्डुवाडी (ता. माढा) येथील लाखों रुपयांचे मोबाईल गेमबद्दल शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाचे प्रकरण गाजले असतानाच बार्शी तालुक्यातही मोबाईलवरील चक्री गेमने तरुणांना भूरळ पाडली असून, अनेक तरुणांनी कुटुंबाच्या परस्पर लाखो रुपये उधळून कर्जबाजारी झाल्याने मृत्यूला जवळ करुन जीवन संपविले आहेत. कुसळंब (ता. बार्शी) येथील तरुणाने चक्री गेमच्या व्यसनाने कर्जाचा डोंगर करुन आत्महत्या केली असून याकडे शासनाने वेळीच पायबंद घालण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

समाधान तुकाराम ननवरे (वय-३२, रा. कुसळंब, ता. बार्शी) या तरुणाने शुक्रवार (ता. २४) रोजी मध्यरात्रीनंतर राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, आई - वडिलांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. मागील सात वर्षांपासून शहरातील शिवाजीनगर भागात कॉलेज रस्त्यावर डायमंड सलूनचे दुकान समाधान याने थाटले होते. वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, नागरिक, विद्यार्थी असा मोठा संपर्क निर्माण करुन दुकानात ग्राहकांची रांग लागत असे रात्री दहा वाजले तरी काम संपत नसे.
पण या तरुणाला मोबाइलवरील चक्रीगेमचे व्यसन लागले रात्री उशिरापर्यंत गेम खेळत असत कधी लाख रुपये येत तर कधी दोन लाख जात असत, अनेक मित्रांकडून पैसे घेत असे आणि परतावाही करत असे पतसंस्था, बँक, खासगी सावकार यांचेकडून पैसे घेतले होते. तसेच स्कॅनर पाठवून ऑनलाइन कंपन्याही तुमची उलाढाल मोठी आहे, तुम्हाला कर्ज देऊ का, पाठवतो असेही पैसे मिळत असत. 
 
भाऊबीजेनिमित्त पत्नी, मुलगा माहेरी गेले होते तर बहिण, आई घरी होते समाधान याने शुक्रवार (ता. २४) रोजी रात्री नऊ वाजता आई, बहिणीसमवेत जेवण केले गप्पा मारल्या अन् रात्री साडेअकरानंतर झोपण्यास दुसऱ्या खोलीत गेला होता. आई सीताबाई ननवरे पहाटे पाचच्या सुमारास पाणी गरम करण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या असता समाधान याने स्लॅबच्या लोखंडी हुकला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी हंबरडा फोडला.
ग्रामीण भागातील तरुण शहरात येऊन व्यवसायामध्ये यश मिळवून यशोशिखरावर जात असताना केवळ मोबाइलवरील गेममुळे घात केला,कुटुंब उघड्यावर आले असे नातेवाईक सांगत होते. एकुलता एक मुलगा होता, तीन बहिणी, आई-वडिल, पत्नी, मुलगा यांनी काय करायचे असा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला असून तरुण पीढी मोबाईल गेमच्या व्यसनाधिनतेमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. याकडे शासनाने लक्ष घालून पायबंद घातला पाहिजे, यासाठी कोण पैसे पुरवतो, अॅप कोण तयार करतो याचा छडा लागला पाहिजे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.