लोकसभा निवडणूक होऊन दीड वर्ष लोटल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षपदाचा घोळ मिटवता आलेला नाही.सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपला लोकसभा निवडणुकीत 400 प्लस किंवा स्वबळाचं स्वप्नं जरी पूर्ण करता आलं नसलं तरी एनडीएचं सरकार केंद्रात सत्तेत आलं. लोकसभा आणि विशेषत:महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आणि आता बिहारच्या निवडणुकीआधी पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा जोर धरू लागली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दिग्गज महाराष्ट्रासह,इतर राज्यातील विविध नेत्यांची नावं शर्यतीत आहेत. पण आता अध्यक्षपदाच्या शर्यतीतून दोन नेत्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती समोर येत आहे. बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह 2019 आणि 2024 प्रभारी पदाची जबाबदारी सांभाळताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या दिग्विजयाच्या शिल्पकार ठरलेल्या आणि राज्यातील नेत्यांपासून केंद्रीय नेतृत्वापर्यंत उत्तम समन्वय राहिलेल्या भूपेंद्र यादव हे दोन्ही नेत्यांचा पत्ता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अखेर बाहेर पडल्याची चर्चा आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं आता या वर्षीच्या अखेरीस होत असलेल्या बिहारची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं मोठी ताकद लावली आहे. याचमुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विश्वासू मानले जाणारे धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे विधानसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी देताना त्यांच्याकडे बिहारच्या प्रभारी पदाची धुरा दिलेली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं बोललं जात आहे.
बिहार विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेची निवडणूक ही भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळेच पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्यासाठी राज्य शाखांची मतदान प्रक्रिया पूर्ण करून प्रधान यांचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. मूळचे ओडिसा येथील असलेले प्रधान जर अध्यक्ष झाले तर पूर्वकडील राज्याला अध्यक्षपद देण्याची भाजपमध्ये पहिलेच वेळ असणार होती. पण आता प्रधान यांच्याकडे बिहार निवडणुकीची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर त्यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मागे पडलं आहे.
तर अमित शाह यांचे 'विश्वासू'मानले जाणारे भूपेंद्र यादव यांचंही नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं. पण आता यादव यांच्याकडे पुढील वर्षी होत असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे यादव यांचं पूर्ण लक्ष आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर असणार आहे.त्यामुळे त्यांचंही नाव भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून पत्ता कट झाल्याचं चर्चा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अध्यक्षपद ठरवण्यात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजप अध्यक्षपदासाठी चार केंद्रीय मंत्री स्पर्धेत आहेत. जे पी नड्डा केंद्रीय मंत्री झाल्यापासून भाजपचे अध्यक्षपद रिक्त आहे. लवकरच नवीन अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये घेतले जात आहे. त्यांच्या नावाबाबत संघ देखील सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांचे देखील नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. संयमी आणि जनधारा असलेला नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जात आहे.
भाजप अंतर्गत पहिल्या महिला अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण यांचे नाव आघाडीवर आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नावाला अध्यक्षपदासाठी सर्वाधिक पसंती असल्याचे म्हटले जात आहे. खट्टर हे पंतप्रधान मोदी यांचे लाडके अन् निकटवर्तीय मानले जात आहेत.केंद्रीय मंत्र्यांसह आंध्र प्रदेशच्या भाजच्या माजी अध्यक्षा डी पुरंदरेश्वरी तसेच वनाथी श्रीनिवासन यांचे नाव देखील अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.