अतिवृष्टीग्रस्तांसाठी मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स व आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची दहा लाखांची मदत
मुंबई, दि. ७ ऑक्टोबर: राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांसाठी मे.पुरुषोत्तम नारायण गाडगीळ (पीएनजी) सराफ आणि ज्वेलर्स यांच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. यासोबतच आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनीही वैयक्तिक स्वरूपात पाच लाखांची मदत दिली आहे. एकूण दहा लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
पीएनजीतर्फे संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांनी आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रत्येकी पाच लाखांचे धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिले. आमदार गाडगीळ हे सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच गरजू व संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीस धावून आले आहेत. त्यांनी यापूर्वीदेखील अनेक वेळा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मदत केली आहे. तसेच मे.पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्सच्या वतीने देखील वेळोवेळी समाजाप्रती आपले उत्तरदायित्व निभावत मदतीचा हात पुढे केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.