Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल

योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल

नवी दिल्ली : भारताचे मुख्य न्यायाधीश  बी. आर. गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टाती बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर  यांनी निलंबनानंतर माध्यमांशी बोलताना सीजेआय आणि न्यायव्यवस्थेवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे.

"सीजेआयने आपल्या संवैधानिक पदाची गरिमा आणि जबाबदारी ओळखायला हवी. न्यायालयातील प्रत्येक वकील त्यांना 'मीलॉर्ड' म्हणतो, त्यांनी या शब्दाचा अर्थ आणि सन्मान दोन्ही समजून घ्यायला हवा," असे किशोर यांनी म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना किशोर म्हणाले, "तर तुम्ही कुणाला भिक देऊ शकत नसाल, तर त्याचे भांडे तरी फोडू नका. 'त्यांना एवढेही अपमानित करू नका की, देवासमोर ध्यान कर...". एवढेच नाही तर, पुढे तुम्ही मॉरिशस सारख्या देशात जाऊन म्हणता की, देश बुलडोझरने चालणार नाही. पण ज्यांच्या विरोधात बुलडोजर कारवाई होत आहे, त्यांनी सरकारी संपत्तीवर कब्जा केला आहे. मोठ मोठे महाल तयार केले आहेत, होटेल्स तयार केले आहेत. "योगी आदित्यनाथ अशा लोकांवर कारवाई करत असतील तर, ती कारवाई चुकीची आहे?" असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी किशोर यांनी हल्द्वानीतील अवैध संपत्ती संदर्भातील न्यायालयाच्या आदेशावरही भाष्य केले. ते म्हटले, "याच सुप्रीम कोर्टाने तीन वर्षांपासून हल्द्वानीमध्ये स्थगिती दिली आहे. जर संपत्ती अवैध असेल, तर निर्णय द्या आणि ज्याची आहे त्यांना परत करा. असे नाही की, यावर बुलडेझर चालणार नाही, हे आधीपासूनच निश्चित करावे. या सर्व गोष्टींमुळे मी दुःखी आहे."

कारण आम्ही प्रचंड सहिष्णू होतो. मात्र जेव्हा आपले अस्तित्वच धोक्यात असेल, तेव्हा, कुठल्याही सनाती व्यक्तीने गप्प बसता कामा नये, घरात जेवढे शक्य असेल, त्याने करावे. मी कुणाला चिथावणी देतन नाही. मात्र त्याने, आपल्या हिताचा नक्कीच विचार करावा, असे मला वाटते. आपल्या नेत्यांनीही, पोलिसांनीही आणि न्यायपालिकेनेही. एवढेच नाही तर, लक्षात असू द्या, जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा केवळ 7 देश होते. आड 57 आहेत. आपण एक होतो आणि अर्धा इकडे दिला आणि अर्धा तिकडे दिला. आता अर्धा पुन्हा विभाजित होणार आहे. तेव्हा आपण कुठे धावणार?' असा सवालही त्यांनी यावेळी केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.