Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित
 

कोल्हापूर : अकलूज (जि.सोलापूर) येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवरील मोक्का कारवाई रद्द करून देण्याचे  आमिष दाखवत तब्बल ६५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी नलावडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, कारवाईची माहिती मिळताच नलावडे यांनी वैद्यकीय रजेचे कारण देत पसार झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी अकलूज पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली आहे.

पाच जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात एकूण पाच जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये...

समीर अब्बास पानारी (३५, रा. महावीरनगर, हुपरी, ता. हातकणंगले)

सतीश रामदास सावंत (७०, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर)

सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे (पोलिस मुख्यालय, कोल्हापूर)

कमलेश रमेश कानडे (रा. लालबाग, मुंबई)

लाला ऊर्फ लालासाहेब ज्ञानेश्वर अडगळे (रा. अकलूज)
 
या आरोपींचा समावेश आहे. या पाच जणांपैकी समीर पानारी आणि लाला ऊर्फ लालासाहेब अडगळे या दोघांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध अकलूज पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून, सरकारी पदाचा गैरवापर करून खंडणी मागणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.