Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विषारी कफ सिरपमुळे नागपुरात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, देशभरात मृतांचा आकडा १५ वर, प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर...

विषारी कफ सिरपमुळे नागपुरात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, देशभरात मृतांचा आकडा १५ वर, प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर...
 

मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता नागपूरमधील रुग्णालयातही विषारी कफ सिरपमुळे १८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरात ही संख्या आता १५ वर पोहोचली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान या मुलीचा मृ्त्यू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं असून योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.

नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली आहे. धानी डेहरिया असं या 18 महिन्याच्या चिमुकलीचं नाव आहे. धानी ही मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यतील रहिवारी असून तिला नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज आल्याने धानीवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान कप सिरपमुळे तिचा मृत्यू झाला. धानीच्या मृत्यूनंतर कफ सिरपमुळे एकूण मृत्यूसंख्या पोहचली १५ वर पोहोचली आहे. 
 
दरम्यान, कफ सिरपमुळे झालेल्या चिमुकलीच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झालं आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयच्या (DMER) पथकाने शासकीय मेडिकल रुग्णालयात पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. DMER च्या चमू मध्ये बीजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ आरती किनीकर, जेजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. छाया वळवी, जे जे महाविद्यालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख भालचंद्र चिकलकर यांच्या समावेश आहे.

यावेळी उपचार सुरू असलेल्या रुग्णांची स्थिती, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि मेडिकल हिस्ट्री तपासण्यात आली आहे. तर 'एम्स नागपूर'च्या नेतृत्वात केंद्राच्या पथकाने छिंदवाडा जिल्ह्यातील परासीया तालुक्यात जाऊन पाहणी केली आहे. कफ सिरपमुळे सर्वाधिक मुले परासीया तालुक्यातील प्रभावित झाली आहेत. केंद्रीय पथक पुढील तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.