तुमच्या बँक खात्यात झिरो बॅलन्स असेल, तरीही तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत 10,000 रुपये पर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा घेऊ शकता. आकस्मिक खर्चासाठी तत्काळ आर्थिक मदत देणारी ही सुविधा अनेकांसाठी वरदान ठरत आहे.
पैसे कसे काढता येतात?
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेले खाते हे झिरो बॅलन्स खाते असते. या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची कोणतीही सक्ती नसते. त्याचबरोबर, खातेदारांना 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट काढण्याचा अधिकार मिळतो.
ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय?
ओव्हरड्राफ्ट म्हणजे, ज्या वेळी तुमच्या खात्यात एकही रुपया नसतो, तेव्हाही बँक तुम्हाला अल्पकालीन कर्ज म्हणून काही रक्कम देते. खाते क्रेडिट झाले की, ही रक्कम परत करावी लागते. या पैशावर बँक काही व्याजही आकारते. याचा उपयोग मुख्यतः आपातकालीन खर्च भागवण्यासाठी होतो.
ओव्हरड्राफ्ट सुविधा कशी मिळते?
ओव्हरड्राफ्टसाठी ग्राहकाने बँकेत जाऊन अर्ज करावा लागतो. बँक खातेधारकाची व्यवहारातील शिस्त, खाते वापर आणि पूर्व इतिहास तपासते. बहुतेक बँका ही सुविधा तात्काळ मंजूर करतात.
ओव्हरड्राफ्टचे फायदे
आकस्मिक परिस्थितीत तत्काळ पैसे उपलब्ध
कर्जासारखी लांब प्रक्रिया नाही
उपचार, तातडीचा खर्च, प्रवास किंवा इतर तातडीच्या गरजांसाठी उपयुक्त
ओव्हरड्राफ्टचे तोटे
यावर सामान्य सेविंग व्याजापेक्षा जास्त व्याज आकारले जाते
वारंवार वापर केल्यास खाते निगेटिव्ह बॅलन्समध्ये जाते
ठराविक मर्यादेपलीकडे रक्कम काढता येत नाही
वेळेत पैसे परत न केल्यास क्रेडिट हिस्ट्री बिघडते
बँकेनुसार शुल्क आणि अटी वेगळ्या असतात
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.