Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डिजिटल स्ट्राइक करत मोदी सरकारचा दणका! 21 लाख मोबाईल क्रमांकांवर धडक कारवाई, तुम्ही सुरक्षित आहात का?

डिजिटल स्ट्राइक करत मोदी सरकारचा दणका! 21 लाख मोबाईल क्रमांकांवर धडक कारवाई, तुम्ही सुरक्षित आहात का?


अनेकदा मोबाईलवर कोणाचाही फोन आल्यास तो ओळखीचा नसल्यास उत्तर न देण्यालाच अनेकांची पसंती असते. अनेकदा अशा क्रमांकांवरून विनाकारण काही मेसेजसुद्धा मोबाईल युजरना येत असतात. अशा क्रमांकांना स्पॅम श्रेणीत मोजत भारतातील टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (TRAI)नं स्पॅम कॉल आणि फसवे मेसेज पाठवणाऱ्यांविरोधात एक धडक कारवाई करत देशातील सर्वात मोठं डिजिटल स्ट्राईक केलं आहे. TRAI च्या माहितीनुसार मागील वर्षभरात साधारण 21 लाखांहून अधिक मोबाईल क्रमांक या कारवाईअंतर्गत हंद करण्यात आले, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं फसवे मेसेज पाठवले जात होते. Fraud Call आणि मेसेजची संख्या अतिशय झपाट्यानं वाढत असून, त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केलं जात असल्याची बाब लक्षात घेता मोदी सरकारकडून ही कारवाई करण्यात आली.


ही कारवाई इतक्यावरच थांबणार नाही, तर...

TRAI च्या माहितीनुसार ही कारवाई इतक्यावरच पुरेशी नसून नागरिकांकडून आता अधिकृत TRAI DND App च्या माध्यमातून स्पॅम फोन कॉल आणि एसएमएस रिपोर्ट करता येईल अशी सुविधा उपलब्थध करून देण्याची मागणी केली जात आहे. उपकरणावर नंबर बंद करून फक्त तो क्रमांक तुमच्या स्क्रीनवरून नाहिसा होतो मात्र ही मंडळी इतरांची फसवणूक करणं सुरूच ठेवतात. 

सामान्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी?
TRAI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार वरील मोठी कारवाई ही अधिकृत ट्राय Appद्वारे करण्यात आलेल्या तक्रारींमुळंच शक्य झाली आहे. जिथं ट्राय आणि टेलिकॉम कंपन्यांकडून ठराविक क्रमांकाचा मागोवा घेतला जातो आणि त्यानंतर त्याची पडताळणी होते पुढं हा क्रमांक कायमस्वरुपी बंद केला जातो. मात्र क्रमांक जेव्हा एखादा युजर फक्त त्यांच्या फोनमध्येच ब्लॉक करतो, तेव्हा मात्र फसवणुकीचा हा प्रकार इतरांच्या क्रमांकांवर सुरूच राहतो.

डिजिटायझेशनच्या या दिवसांमध्ये जग आणि देशही झपाट्यानं पुढे जात असतानाच ट्रायनं ज्येष्ठ नागरिक, महिला आणि डिजिटल क्षेत्रातील फारसं ज्ञान नसणाऱ्या वापकर्त्यांना अनुसरुन काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये सर्व स्मार्टफोनधारकांनी TRAI DND App डाऊनलोड करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, फसवे कॉल किंवा मेसेज आल्यास त्याची या App मध्ये नोंद करावी असं आवाहनही केलं गेलं आहे.

कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी बँकेची माहिती, OTP किंवा कोणतीही खासगी माहिती मेसेज किंवा सोशल मीडिया चॅटवर ठेवू नये, असा इशारा जारी केला आहे. कोणताही धमकीवजा फोन आल्यास फोन कट करून त्या क्रमांकाची माहिची ट्रायपर्यंत द्यावी, याशिवाय सायबर फसवणूक झाल्यास तातडीनं 1930 या सायबर क्राईमच्या देश स्तरावरील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा Chakshu / चक्षू या फिचरच्या वापरानं संशयास्पट टेलिकॉम हालचालींची तक्रार नोंदवावी असंही ट्रायनं स्पष्ट केलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.