नवी दिल्लीः शेअर बाजारात सध्या अनेक शेअर्सनी लाँग टर्ममध्ये रिटर्न दिलेले आहेत. तर काही कंपन्यांच्या शेअर्सनी मागच्या एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. अजूनही त्या शेअर्सची किंमत शंभर रुपयांच्या आत आहे. याच पाच शेअर्सनी चालू वर्षाच्या ११ महिन्यांमध्ये १८४७ टक्के रिटर्न दिल्याचं बीएसईच्या आकडेवारीवरुन दिसून येतंय.
१. श्री चक्र सिमेंट लिमिटेड
या शेअरने ३.४६ रुपयांवरुन ६७.३७ रुपये इतकी उसळी घेतली आहे. श्री चक्र सिमेंट हा या बास्केटमधला सगळ्यात मोठा मल्टीबॅगर शेअर ठरला आहे. या शेअरने वर्षभरात १८४७ टक्क्यांचा नफा मिळवून दिला आहे. मात्र मंगळवारी हा शेअर पाच टक्क्यांनी कोसळून लोअर सर्किटवर पोहोचला आहे. हे संकेत प्रॉफिट बुकिंगचे असल्याचं सांगितलं जातंय.
२. आयस्ट्रीट नेटवर्क लिमिटेट
बीएसईवर हा शेअर ४.०७ रुपयांवरुन ४३.७२ रुपयांवर पोहोचला. आयस्ट्रीट नेटवर्कचा हा शेअर आतापर्यंत ९७४ टक्के वाढला आहे. मंगळवारी हा शेअर १.३९ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. ही कंपनी एआय, ई-कॉमर्स आणि आयटी सेवांमध्ये काम करते. तसेच रिटेल कॅटलॉग असलेली ही कंपनी आहे.
३. ब्लू पर्ल अॅग्रीवेंचर्स लिमिटेड
यावर्षी हा स्टॉक बीएसईवर १२.९१ रुपयांवरुन ९९.५० रुपयांपर्यंत पोहोचला. कृषी उत्पादन करणारी कंपनी ब्लू पर्ल अॅग्रीव्हेंचर्सने २०२५ मध्ये ६७१ टक्क्यांची वाढ नोंदवली असून त्याची किंमत आता शंभर रुपयांच्या घरात आहे. मंगळवारी या शेअरमध्ये ४.९९ टक्के इतकी वाढ झाली. ही कंपनी मसाले, तेलबिया आणि धान्यासह, कृषी आणि खाद्य उत्पादित करते.
४. राजस्थान ट्यूब मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड
चालू वर्षात या कंपनीच्या शेअरने बीएसईवर ९.२१ रुपयांवरुन ४१.५० रुपयांपर्यंत वाढ नोंदवली आहे. राजस्थान ट्यूब कंपनीचा शेअर ३५१ टक्के वाढला आहे. मात्र मंगळवारी या शेअरने किरकोळ घसरण नोंदवली. एक्सचेंज फाईलिंगवरुन कळतंय की, बोर्डाने १२ नोव्हेंबर रोजी तात्काळ प्रभावाने कंपनीच्या सचिव पायल सिंह यांचा राजीनामा स्वीकार केला.
५. वीआर वूडआर्ट लिमिटेड
यावर्षी हा शेअर बीएसईवर ६.३७ रुपयांवरुन ५७.०१ रुपयांवर पोहोचला आहे. या स्टॉकने आतापर्यंत ७९५ टक्के रिटर्न दिले आहेत. मंगळवारी हा शेअर १.९९ टक्के घसरला, परंतु १०० रुपयांपेक्षा कमी कॅटेगिरीत टॉप फरर्मेंशन देणारा शेअर बनला आहे. लाकडी उत्पादनं हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे.(सूचनाः- कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.