Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big News ! गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता

Big News ! गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता


लवकरच सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर येऊ शकते. कारण जे लोक घर, गाडी किंवा पर्सनल लोन घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँक या वर्षाच्या शेवटपर्यंत रेपो रेट कमी करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. व्याजदरात कपात केली जाऊ शकते.

रेपो रेट कमी झाल्यावर गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच पर्सन लोन देताना व्याजदरात कपात केली जाईल. त्यामुळे सामान्यांना भराव्या लागणाऱ्या ईएमआयमध्येही कपात होईल. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी तसे संकेत दिले आहेत.

रेपो रेट कमी करायचा की तो स्थिर ठेवायचा याबाबतचा अंतिम निर्णय पतधोरण समितीकडून घेतला जाईल. परंतु रेपो रेट कमी करण्यासाठी संधी आहे, असे त्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी पतधोरण समितीत नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पतधोरण समितीची पुढील बैठक येत्या 3 ते 5 डिसेंबर रोजी होणार आहे. ही बैठक अगदी तोंडावर आलेली असताना आरबीआयच्या गव्हर्नरांनी रेपो रेट कमी करण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता येत्या डिसेंबर महिन्यात खरंच रेपो रेट कमी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.