Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महानगरपालिका निवडणुकांना ब्रेक लागणार? मुंबई, ठाणे, पुण्यासह 28 मनपांच्या निवडणुका मार्चनंतर होणार? जाणून घ्या मोठी अपडेट

महानगरपालिका निवडणुकांना ब्रेक लागणार? मुंबई, ठाणे, पुण्यासह 28 मनपांच्या निवडणुका मार्चनंतर होणार? जाणून घ्या मोठी अपडेट


राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यापैकी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठव्या महानगरपालिका निवडणुका होणार असल्याचा अंदाज होता. पण आता या महानगरपालिका निवडणुकांना ब्रेक लागणार असल्याचं बोललं जात आहे. महानगरपालिका निवडणुकांना ब्रेक लागणार? मुंबई, ठाणे, पुण्यासह 28 मनपांच्या निवडणुका मार्चनंतर होणार? जाणून घ्या मोठी अपडेट

महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलणार?
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे यासह राज्यातील 28 महानगरपालिकांच्या निवडणुका या पुढे ढकलल्या जाणार असल्याची चर्चा आहे. महानगरपालिका निवडणुका या थेट मार्च महिन्यानंतरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात दैनिक पुढारीने वृत्त दिलं आहे.
निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता का?

महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलली जाणार असल्याची अनेक कारणे असल्याचं बोललं जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 या काळात होणार आहे. अधिवेशन सुरू असल्याने त्या काळात निवडणूक आयोगाकडून महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करण्याची शक्यता फारच कमी आहे. अधिवेशन काळात निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे टाळले जाते असं म्हटलं जातं. जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतील. यानंतर लगेचच दहावी आणि बारावीच्या परीक्षा असणार आहेत. सलग निवडणुकांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांवर तसेच पोलिसांवर येणारा ताण लक्षात घेता महानगरपालिका घ्याव्या की नाही याचा विचार निवडणूक आयोगाला करावा लागणार आहे.


निवडणूक आयोग विनंती करणार?
सलग येणाऱ्या निवडणुकांमुळे कर्मचाऱ्यांवरील ताण, पोलीस बंदोबस्त तसेच 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा या सर्वांचा विचार करता निवडणूक आयोगाकडून न्यायालयाला माहिती दिली जाऊ शकते. तसेच महानगरपालिका निवडणुकांसाठी आणखी 3 महिन्यांचा काळ वाढवून देण्याची मागणी केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकूणच महानगरपालिकांच्या निवडणुकीची 31 जानेवारी 2026 ची डेडलाईन वाढवून देण्याची विनंती निवडणूक आयोगाकडून न्यायालयाला केली जाऊ शकते असंही म्हटलं जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.