Big Breaking ! 21 नोव्हेंबरला DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? सिद्धरामय्यांचं काय होणार? काँग्रेस सरकारवर मोठं संकट
बंगळूर : मुख्यमंत्री बदल हा राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. २१ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेणार असल्याची चर्चाही जोरात आहे.
मात्र, या बातमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्याने सत्ताधारी काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारले, '२१ नोव्हेंबर रोजी शिवकुमार मुख्यमंत्री होणार, यात किती तथ्य आहे? या प्रश्नावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले. मोठ्या आवाजात उत्तर देताना त्यांनी म्हटले, 'तुम्ही मला सांगितले का? तुम्हाला कसे कळले? कोणत्या वर्तमानपत्रात पाहिले, वाचले तुम्ही? मी सर्व वर्तमानपत्रे वाचली, पण मला असं काही दिसलं नाही.'
या तीव्र प्रतिक्रियेनंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शिवकुमारांचा 'नोव्हेंबर क्रांतीचा संदेश' हायकमांडकडे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनुसार, शिवकुमार यांनी हायकमांड आणि त्यांच्या निकटच्या आमदारांना 'नोव्हेंबर क्रांती'चा संदेश दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, २१ नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय व्हावा.
अन्यथा 'पुढे काय करायचे, हे मला माहिती आहे', असे त्यांनी सिद्धरामय्या यांच्या जवळच्या सहकाऱ्याला फोनवरून सांगितल्याची माहिती समोर आली आहे. शिवकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या निकटच्या सहकाऱ्यांनाही हाच संदेश दिला असून, 'पक्षाच्या हितासाठी निर्णय घ्या' अशी भावनिक विनंती त्यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे.
सिद्धरामय्या गटात खळबळ
या घडामोडींनंतर सिद्धरामय्या समर्थकांमध्ये खळबळ माजली आहे. 'शिवकुमार यांनी ठरवलेली अंतिम मुदत खरी आहे का?, 'हायकमांड यावर काय भूमिका घेईल?' अशा प्रश्नांची चर्चा काँग्रेसच्या शिबिरात सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांनी अधिकृत भूमिका जरी घेतली नसली, तरी मुख्यमंत्र्यांच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.
नोव्हेंबरमध्ये 'राजकीय क्रांती'?
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवकुमार यांनी नोव्हेंबर महिन्यात तीन संभाव्य तारखा निश्चित केल्या आहेत. परंतु, कोणती तारीख निर्णायक ठरेल, हे स्पष्ट नाही. दरम्यान, हायकमांड पातळीवर मुख्यमंत्रिपद बदलाची चर्चा किती गांभीर्याने घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एकंदरीत सत्तावाटपाचा वाद पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये उफाळून आला असून, नोव्हेंबरमध्ये राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.