राज्यातील आरोग्य यंत्रणा हादरली! सिझर झालेल्या ४ मातांचा मृत्यू; शस्त्रक्रिया विभागात नेमकं काय चाललंय?
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील लतामंगेशकर रुग्णालय सध्या एका अत्यंत खळबळजनक आणि गंभीर घटनेमुळे चर्चेत आले आहे. गेल्या २५ दिवसांच्या आत येथे नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर चार मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या चारही मातांची प्रसूती ॲाक्टोबर महिन्यात झाली होती आणि त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
नेमके काय घडले?
ॲाक्टोबर महिन्यात ज्या चार महिलांची प्रसूती सिझर पद्धतीने झाली होती, त्यांचा प्रसुतीनंतर काही दिवसांतच मृत्यू झाला. सिझर झाल्यानंतर अवघ्या २५ दिवसांच्या आतच या महिलांनी जीव गमावला. दुर्दैवी बाब म्हणजे, या मातांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, ज्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चौकशी समिती रुग्णालयात
या गंभीर घटनेची दखल घेत एक विशेष चौकशी समिती लतामंगेशकर रुग्णालयात दाखल झाली. समितीने या मातांच्या मृत्यूची नेमकी कारणे आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे. समितीने शस्त्रक्रिया विभागाचे नमुने घेऊन चौकशीसाठी पाठवले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.