Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking ! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा श्रीनगर पोलीस ठाण्यात स्फोट, 9 जणांचा मृत्यू 29 जखमी

Big Breaking ! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा श्रीनगर पोलीस ठाण्यात स्फोट, 9 जणांचा मृत्यू 29 जखमी


फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करताना जप्त केलेल्या स्फोटकांचा शुक्रवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये नमुने घेतले जात असताना स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की या घटनेत आठ पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 360 किलोग्रॅम स्फोटके नौगाम येथे आणली होती. परंतु जप्त केलेले संपूर्ण स्फोटके पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली होती की इतरत्र ठेवण्यात आली होती हे स्पष्ट नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये पोलीस अधिकारी, न्यायदंडाधिकारी आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी टीमच्या सदस्यांचा समावेश आहे. हा स्फोट इतका तीव्र होता की, अनेक मैलांवरील घरांना त्याचे धक्के जाणवले. यामुळे घरांच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्याचे समजतय. या घटनेचे व्हिडिओ फुटेजमध्ये स्फोटानंतर आग लागलेला पार्किंगचा परिसर दिसत आहे. घटनास्थळी अनेक वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रात्री 11:20च्या सुमारास नौगाम पोलिस स्टेशनमध्ये एफएसएल टीम पोलिस आणि तहसीलदारांसह मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट स्फोटकांची तपासणी करत असताना मोठा स्फोट झाला. हा स्फोट दहशतवादी हल्ला नव्हता. ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. 

हा भीषण अपघात काही दिवसांपूर्वी झालेल्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर घडला आहे. दिल्लीतील त्या स्फोटात 90 किलोपेक्षा जास्त स्फोटकांनी भरलेली हुंडई आय 20  कार उडवण्यात आली होती. या घटनेत 13 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. दिल्लीतील या आत्मघाती हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर उन नबी होता जो फरिदाबादमधून कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य होता.

फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठ हे दहशतवाद तपासणीच्या केंद्रस्थानी आहे, कारण या विद्यापीठातील अनेक कर्मचाऱ्यांचे या जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंध आढळून आले आहेत. यात डॉ. मुझम्मिल शकिल, डॉ. निसार-उल-हसन आणि इतर काही जणांचा समावेश आहे. माहितीनुसार, या कटकारस्थान करणाऱ्यांनी विद्यापीठाच्या इमारत क्रमांक 17 मधील रूम क्रमांक 13 मध्ये बैठका घेऊन त्यांचे कट रचले होते.
जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणामधील तपासणीनंतर उत्तर प्रदेशमधील त्यांचे साथीदार डॉ. शाहीन आणि डॉ. आदिल राथर यांना अटक करण्यात आली. यामुळे तपासकर्त्यांना आता हा कट 'मल्टि-स्टेट व्हाईट कॉलर दहशतवादी नेटवर्क' असल्याचा संशय आहे. दिल्ली कार बॉम्बस्फोटाचा तपास अजूनही सुरू आहे. केंद्र सरकारने गुन्हेगारांना शिक्षा होईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान शुक्रवारी प्रशासनाने या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर उन नबी याचे पुलवामा येथील घर उद्ध्वस्त केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.