Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोण होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री? नितीश कुमार यांच्यासह 'ही' 5 नावं चर्चेत

कोण होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री? नितीश कुमार यांच्यासह 'ही' 5 नावं चर्चेत


नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. कारण बिहारमध्ये भाजपनंतर जेडीयू हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत 7 वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेले नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? पाहुयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट..

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं त्यांच्या राजकीय विरोधकांना चारीमुंड्या चित केलं आहे.. ऐतिहासिक बहुमत मिळवत भाजप आणि जेडीयूनं बिहारमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. बिहार निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी नितीश कुमारांची देखील बिहारमध्ये जादू पाहायला मिळाली आहे. भाजपपाठोपाठ नितीश कुमारांचा जेडीयू दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान नितीश कुमार यांच्यासह विजय कुमार सिन्हा, सम्राट चौधरी, रेणु देवी आणि रामकृपाल यादव ही चार नावं चर्चेत आहेत.


आतापर्यंत कितीवेळा मुख्यमंत्री?
- 2000 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या पाठिंब्याने नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत

- विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर सात दिवसांनी राजीनामा दिला.

- 2005 मध्ये भाजप आणि समता पक्षासोबत युती करून नितीश कुमार दुस-यांदा मुख्यमंत्री झाले आहेत

- 2010 मध्ये एनडीएचा विजय झाला आणि पुन्हा एकदा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत

- 2013 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती तोडली आणि आरजेडीसोबत जात सरकार स्थापन करत मुख्यमंत्री झालेत

- 2015 मध्ये लालू प्रसाद यांच्या आरजेडीसोबत युती करून महाआघाडीची स्थापना करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मान

- 2017 मध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी यू-टर्न घेत आरजेडीची साथ सोडली आणि भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपसोबतच्या सरकारमध्ये तेच मुख्यमंत्री झाले आहेत.

- 2020 मध्ये नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेत, जेडीयूला या निवडणुकीत 43 जागा मिळाल्यात.. मात्र, पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

- 2025 मध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? याकडे आता लक्ष लागलं आहे.

2020च्या तुलनेत नितीश कुमारच्या जेडीयूला यंदाच्या निवडणुकीत जबरदस्त यश मिळालं आहे.

नितीश कुमारांची जादू कायम

2020 मध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूला 43 जागा मिळाल्या होत्या, मात्र, आता 84 पेक्षा जास्त जागांवर जेडीयूच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा त्यांचा दम दाखवलाय.. बिहारमध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर जेडीयूच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून "न भूतो न भविष्यति.. नितीश कुमार बिहार के मुख्यमंत्री थे, हैं. और रहेंगे.. ही पोस्ट करण्यात आली.. मात्र, काही मिनिटातच ही पोस्ट जेडीयूच्या ट्विटर हँडलवरून डिलिट करण्यात आली आहे.

पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात आपणच बाहुबली असल्याचं नितेश कुमार यांनी दाखवून दिलं. या निवडणुकीतही नितीश कुमारांच्या जेडीयूनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सातवेळा मुख्यमंत्रिपद भुषवणा-या नितीश कुमारांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार का? याकडे आता लक्ष लागलंय..

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.