पुष्पम प्रिया यांचा मोठ्या फरकाने पराभव, दरभंगा मतदारसंघात मिळाली अवघी १४०३ मते
ईव्हीएमवरून भाजपच्या विजयावर घेतला आक्षेप
ईव्हीएमद्वारे त्यांच्या कुटुंबीयांचे आणि मुस्लिम मतदारांचे मत भाजपकडे वळवल्याचा केला आरोप
बिहारमध्ये एनडीएने विक्रमी विजय मिळवला आहे. दुसरीकडे या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. तेजस्वी यादव यांचा आरजेडी, प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्षासहित पुष्पम प्रिया यांचीही जादू चालली नाही. बिहारमध्ये द प्लूरल्स पक्षाला खातं देखील उघडता आलं नाही. पुष्पम प्रिया या स्वत:च्या मतदारसंघात ८व्या स्थानावर फेकल्या गेल्या. निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर पुष्पम प्रिया यांनी पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं.
दरभंगा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या पुष्पम प्रिया यांना अवघ्या १४०३ मते मिळाली. या मतदारसंघात भाजपचे संजय सरावगी यांचा विजय झालाय. निकाल जाहीर झाल्यानंतर पुष्पम प्रिया यांनी पोस्ट करत माझ्या विभागातील आणि नातेवाईकांचे मते देखील मिळाली नाहीत. मी गृहीत धरलेली हजारो मते मिळाली नाहीत'.पुष्पम प्रिया यांनी पुढे म्हटलं की, 'ईव्हीएम रिगिंगमध्ये माझी आई, घर आणि परिसर आणि नातेवाईकांची मते देखील मिळाली नाहीत. ती मते भाजपला वळली. बुथवरून शेकडो मते वळली आहेत. प्रत्येक बुथवर एक सारखा पॅटर्न होता'.पुष्पम प्रिया यांनी पुढे म्हटलं की, 'दरभंगामध्ये मुस्लिमांची हजारो मते आहेत. त्यांच्याशी माझा चांगला संपर्क आहे. त्यांच्या वस्तीतील बूथवरूनही भाजपला मते वळली आहेत. ज्या ठिकाणी भाजपचा पराभव होणार होता, तिथे त्यांनी विक्रमी मते मिळवून विजय मिळवला आहे. कधीही न मिळणारे मते देखील त्यांना मिळाली आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून विरोधकांच्या मतावर दरोडा घालण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.