Big Breaking ! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
मुंबई महानगर प्रदेशात आज एक मोठी आणि गंभीर समस्या निर्माण झाली आहे. चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स संकुलाजवळ गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची मुख्य पाईपलाईन खराब झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तिन्ही प्रमुख शहरांचा गॅस पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. या दुर्घटनेचा सर्वात तीव्र परिणाम सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांवर झाला आहे. अनेक सीएनजी स्टेशन्सचा पुरवठा थांबल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील टॅक्सी, ऑटो आणि बस सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. सीएनजी मिळवण्यासाठी स्टेशन्सवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पीएनजी ग्राहकांनाही फटका
या पाईपलाईनच्या नुकसानीमुळे केवळ सीएनजीच नव्हे, तर हजारो घरगुती ग्राहकांना स्वयंपाकासाठी वापरला जाणारा पीएनजी पुरवठाही बाधित झाला आहे.
दुरुस्तीचे काम सुरू
GAIL आणि महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली आहे. RCF परिसरातील या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून, पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या मोठ्या भौगोलिक क्षेत्रातील गॅस पुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यामुळे, नागरिकांचे जनजीवन आणि शहरातील वाहतूक व्यवस्था गंभीररित्या विस्कळीत झाली आहे. पुरवठा लवकर सुरू व्हावा, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.