Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-आत्महत्येपूर्वी शौर्य पाटीलचे सामाजिक भान; सुसाईड नोटमध्ये लिहिलं.

सांगली :-आत्महत्येपूर्वी शौर्य पाटीलचे सामाजिक भान; सुसाईड नोटमध्ये लिहिलं.

सांगली : नवी दिल्लीत शौर्य पाटील यांच्या आत्महत्येने दिल्लीसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 16 वर्षांच्या शौर्यने आत्महत्या का केली, याचे कारण लिहिले आहेच. त्याचवेळी तो किती समजूतदार होता, हेदेखील समोर आले आहे.


दिल्लीमधील सेंट कोलंबस शाळेत दहावीत शिकणाऱ्या शौर्य पाटीलने मंगळवारी (18 नोव्हेंबर) आत्महत्या केली. राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून त्याने उडी मारून आयुष्य संपवले. त्यानंतर त्याच्या सुसाईट नोटमधून धक्कादायक बाब उघड झाली. शिक्षिकांनी सर्वांसमोर केलेल्या अपमानामुळे त्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिल्यामुळे आता शाळा आणि त्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी शौर्यचे वडील प्रदीप पाटील आणि मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे शौर्यने दीड पानाच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले.

शौर्य पाटील याने मंगळवारी आत्महत्या केली. त्यानंतर आज (20 नोव्हेंबर) त्याचे पार्थिव त्याच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावात आणण्यात आले. त्यामुळे संपूर्ण गाव शोकाकूल झाले आहे. शौर्यचे वडील प्रदीप पाटील सोने-चांदीच्या व्यवसायामुळे अनेक वर्षांपासून दिल्लीत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे शौर्य शिकायला दिल्लीत होता. त्याने आत्महत्येपूर्वी दीडपानी सुसाइड नोट लिहिली आहे. यात I am Sorry अशी सुरुवात केली आहे. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, I am Sorry, मैं उनको कुछ नहीं दे पाया. सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं! त्याचवेळी शौर्यने शिक्षकामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

याच सुसाइड नोटमध्ये शौर्यने त्याची सामाजिक जाणीव दाखवली आहे. आत्महत्येनंतर त्याचे अवयव दान करावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. शौर्य हा खूप समंजस मुलगा होता. 'Sorry दादा, Sorry बाबा, मला तुमच्यासारखा चांगला माणूस बनायचे होते' हे त्याच्या सुसाइड नोटमधील वाक्यही हृदयाला छिन्नविछिन्न करते. या सुसाइड नोटवरून शौर्य हळवा आणि समजूतदार मुलगा होता. त्यामुळेच त्याला त्याचा शिक्षकांनी सर्वांच्या समोर केलेला अपमान सहन झाला नाही. शौर्यच्या आत्महत्येमुळे दिल्लीत पालकांनी शाळेवर मोर्चा काढला तर सांगली जिल्हा आणि पाटील कुटुंबिय शोककूल झाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.