सांगलीच्या ग्रामीणच्या हद्धीत असणाऱ्या गावात अवैध धंद्याचा ऊत आला असून ग्रामीण पोलीसांचे दुर्लक्ष झाले आहे.
या हद्दीतल्या गावात हातभट्टी, जुगार, गांजा आणि मटका जोरात सुरु असून ग्रामीण पोलिसांचे अक्ष्मय दुर्लक्ष झाले आहे.
या हद्दीतल्या गावात राजरोज अवैध धंदे सुरु असून त्या- त्या गावातल्या नागरिकांना फार त्रास सोसावा लागतो या गावातील नागरिकांनी तक्रार केली तर त्यांनाच या अवैध धंदेवालांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नाही असे चित्र आहे.
पण हे अवैध धंदे चालतातच कसे यांना कोणचा आशीर्वाद आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे या मागे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे सगळेच चिडीचूप राहतात. या अवैध धंदे बंद कधी होणार का ये रे माझ्या मागल्या.... याबाबत पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात हे पहाणे गरजेचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.