Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर पावसाचा शेवटचा दिवस आला! हवामान विभागाने सांगितलं थंडी कधीपासून होणार सुरू...

अखेर पावसाचा शेवटचा दिवस आला! हवामान विभागाने सांगितलं थंडी कधीपासून होणार सुरू...


नवरात्र गेली, दिवाळी गेली आता तर तुळशीचं लग्नही पार पडलं, मात्र अद्यापही राज्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरीही पावसाने एग्झिट घेतली नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अखेर हवामान विभागाने पावसाची शेवटची तारीख सांगितली आहे. 

अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. कधी मुसळधार तर कधी मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात अद्यापही कमी दाबाचं क्षेत्र सक्रीय असल्याकारणाने मध्य महाराष्ट्र, कोकात हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान ६ ते ८ नोव्हेंबरनंतर हवामान कोरडं होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पाऊस कधी थांबणार...
थंडीची चाहूल लागणार असल्याचं सांगण्यात आलं असलं तरीही नोव्हेंबर महिन्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात ४ आणि ५ नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता असून ६ नोव्हेंबरपासून राज्यात पावसाची शक्यता नसल्याचं ज्येष्ठ हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात आलं. ६ नोव्हेंबरनंतर हवामान कोरडं होऊन थंडी सुरू होऊ शकते. पावसाळी वातावरण निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरीही मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सांहवी या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.