Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अर्ध शरीर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा मदतीसाठी टाहो, बाजूला २० मृतदेह पडलेले; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

अर्ध शरीर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा मदतीसाठी टाहो, बाजूला २० मृतदेह पडलेले; घटनास्थळी हादरवणारं दृश्य


तेलंगनातील रंगारेड्डी इथं सोमवारी भीषण अपघात झाला आहे. खडी भरून निघालेल्या डंपरने राज्य परिवहनच्या बसला धडक दिली. या अपघातात बसमधील २० जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर २० जण गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बस तंदूरहून हैदराबादच्या दिशेनं जात होती. या बसमध्ये ७० पेक्षा जास्त प्रवासी होते. बसमध्ये बहुतांश विद्यार्थी प्रवास करत होते.



पोलिसांनी अपघाताबाबत माहिती देताना सांगितलं की, खानपूर गेटजवळ चुकीच्या दिशेनं येणाऱ्या डंपरनं बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा चुराडा झालाय. तर डंबरमधील खडी बसमधील प्रवाशांवर पडली. यात अनेक जण गाडले गेले. बसमधील स्टाफने जवळपास १५ जणांना वाचवलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले. खडीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीने बचावकार्य सुरू केलं. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय

दुर्घटनेनंतर तेलंगनाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शोक व्यक्त केलाय. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, अधिकाऱ्यांना घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिलेत. घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल. जखमींवर चांगले उपचार करण्याची व्यवस्था करण्याबाबत निर्देश दिले आहेत.अपघातानंतर हैदराबाद विजापूर नॅशनल हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. चेवेल्ला विकाराबाद महामार्गावर वाहनं थांबवल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

बस आणि ट्रकच्या चालकांचा या अपघातात मृत्यू झालाय. तर मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. यात एक महिला आणि तिच्या अवघ्या १५ महिन्यांच्या चिमुकल्याचाही मृत्यू झालाय. मृतदेह खडीच्या ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सध्या सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.