भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता त्यांचे लग्न जवळपास मोडले असल्याचे म्हटले जात आहे. पलाशने स्मृतीसोबत रिलेशनशीपमध्ये असतानाही कोरिओग्राफर मॅरी डी'कोस्टाला डेट केल्याचे समोर आले. तसेच स्मृतीचे वडील श्रिनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयाच दाखल करण्यात आले. त्यापोठापाठ पलाशलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता स्मृतीचा भाऊ श्रावणने घेतलेल्या निर्णयाचे प्रचंड कौतुक होत आहे.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या जीवनातील सर्व गोंधळात, श्रावणने सोशल मीडियावर पलाशला अनफॉलो केले आहे. श्रावण आणि पलाश हे अतिशय जवळचे मित्र आहेत. ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी, श्रावण हा स्मृतीचा भाऊ आहे. श्रावनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नजर टाकली तर तो फक्त ७ लोकांना फॉलो करतो आणि त्यात पलाशचा समावेश नाही. मात्र, पलाश श्रावणला फॉलो करतो आहे आणि त्याने त्याला अनफॉलो केलेले नाही.
स्मृती मानधनाने तिचे आणि पलाश मुच्छलचे सर्व प्री-वेडिंग आणि प्रपोजल व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढून टाकले आहेत. तिच्या टीममेट्सनीही त्यांच्या प्रोफाइलमधून रील्स काढून टाकल्या आहेत. स्मृती आणि पलाशच्या लग्न पुढे ढकलण्यामागचे पहिले कारण तिचे वडील असल्याचे समोर आले होते. तिच्या वडिलांना हृदयविकाराच्या लक्षणांसारखे वाटू लागले आणि लग्नाच्या दिवशी त्यांना सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर पलाशवर एका महिलेने अनेक आरोप केले. त्याचे त्या महिलेसोबतचे चॅट्स समोर आले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा कधीच स्वतःला या वादात ओढून घेण्याचा हेतू नव्हता. तिने हेही सांगितले की ती मॅरी डी'कोस्टा नाही आणि लोकांनी तिच्यावर लक्ष केंद्रित करणे थांबवावे. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, ही तिच ती व्यक्ती आहे ज्याने चॅट्स पोस्ट केल्या आणि तिची ओळख बाहेर येऊ नये म्हणून तिने नाव वापरले. तिने सांगितले की पलाशचे मेसेज मे-जुलै 2025 चे आहेत आणि ती त्याला कधीच भेटलेले नाही.
मी त्याला उघड केले कारण मला क्रिकेट आवडतो, मी स्मृती मानधनाचा खूप आदर करते आणि मला वाटते लोकांना हे माहित असावे. मी कोरिओग्राफर नाही, ना ती व्यक्ती आहे ज्याशी त्याची फसवणूक केली आहे. मला या परिणामाची अपेक्षा नव्हती आणि मला माझे अकाउंट प्रायव्हेट करावे लागले. चॅट्समध्ये स्पष्ट आहे की मी दोषी नव्हते, मीच त्याला सर्वांसमोर आणले. कृपया मला लक्ष्य करू नका; मी हे खरेच सहन करू शकत नाही. मला यापैकी काहीच हवे नव्हते" अशी पोस्ट त्या महिलेने केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.