पन्नास खोके सत्य घटना ! शिवसेना फुटीवेळी 'त्या'आमदाराने एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी घेतले; भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ
शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपये मिळाल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत होता. मात्र आता याबाबत भाजप आमदारानेच शिंदेंच्या एका आमदारांबाबत हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून फुटीच्या वेळी ५० कोटी घेतल्याचा गंभीरआरोप भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे.
शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळी विरोधकांकडून ५० खोके एकदम ओके, अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. मात्र संतोष बांगर हे शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदेंसोबत गेले नाहीत. एवढंच काय ते त्यांच्यासोबत गुवाहटीलाही गेले नाही. अखेरच्या क्षणी अविश्वास ठरावाच्या वेळी बांगर यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. संतोष बांगर अखेरच्या क्षणी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते.मात्र शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याबाबत भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी गंभीर दावा केला आहे. संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून ५० कोटी रूपये घेतले, असा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी साम टिव्ही शी बोलताना केला आहे. ते म्हणाले की, पन्नास खोके ही घटना सत्य आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेंकडून पन्नास कोटी रुपये घेतले आहेत साम टीव्हीसोबत बोलताना बांगर यांच्याबाबत दावा केला आहे.स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर्गत कलह सुरू झालाय. आता हिंगोलीमध्येही बांगर आणि मुटकुळे यांच्यामध्येही आरोप-प्रत्यारोपच्या फैरी सुरु आहेत. मात्र मुटकुळे यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.