Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली


भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनावर दुसरं संकट आलंय.स्मृतीच्या विवाह समारंभाआधी तिच्या वडिलांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यानंतर आता हाती आलेल्या माहितीनुसार, स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजेच पलाश मुछल याचीही प्रकृती बिघडली आहे.

वडिलांच्या पाठोपाठ पलाश मुछल याचीही प्रकृती बिघडल्यानं लग्न घरी चिंतेचं वातावरण पसरलंय. पलाश मुछलची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपाचर करून त्याला परत घरी सोडलंय. हाती आलेल्या माहितीनुसार, पलाश मुछल याला व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. शरिरातील पित्त वाढल्याने आपण रुग्णालयात गेलो होतो, असं त्याने माध्याम प्रतिनिधींना माहिती दिलीय.

स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत अपडेट
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. त्यामुळे स्मृती मानधनाचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलाय. गेल्या ३ दिवसांपासून या लग्न सोहळ्याची तयारी सुरू होती. वेगवेगळे इव्हेंट्स या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पार पडत होते. आज सायंकाळी मुख्य लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र त्याआधीच स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.