Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत Hit & Run मद्यधुंद कार चालकाने 11 जणांना उडवले परिसरात खळबळ

सांगलीत Hit & Run मद्यधुंद कार चालकाने 11 जणांना उडवले  परिसरात खळबळ


सांगलीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. मद्यधुंद कार चालकाने ४ ते ५ वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे. सांगली शहरातील बालाजी मिल रोडवर रविरारी रात्री ही घटना घडली. अपघातात पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

पुण्यानंतर आता सांगलीतही भीषण अपघाताची घटना घडलीये. सांगलीत मद्यधुंद वाहन चालकाने मद्यधुंद अवस्थेत चार ते पाच वाहनांना धडक दिली. मद्यधुंद कार चालकाने 10ते  11गाड्यांना उडवल्याने रस्त्यावर उपस्थित नागरिक संतापले. संतप्त नागरिकांनी वाहनाची तोडफोड केली. सांगलीतील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मद्यधुंद कार चालकाने दुचाकी वाहनाधरक आणि पादचाऱ्यांनाही उडवलं. या अपघातात चार ते पाच जण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. त्यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहनाचा पाठलाग केला. अपघातानंतर संतप्त लोकांनी त्याचा रस्त्यात अडवून त्याच्या कारची तोडफोड केली. लोकांनी मद्यधुंद चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेने सांगलीकर हादरून गेले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.