Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!


सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या ८वा वेतन आयोगाची जोरदार चर्चा आहे. सरकारने गेल्या महिन्यात या आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वेतन किती वाढेल, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. कारण, फिटमेंट फॅक्टर नावाचा हा घटकच त्यांची नवीन बेसिक सॅलरी किती असेल, हे ठरवणार आहे.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, फिटमेंट फॅक्टर म्हणजे एक गुणांक असतो, ज्याच्या मदतीने कर्मचाऱ्यांच्या जुना बेसिक पगार नवीन पगारात रूपांतरित केला जातो. या आयोगाच्या वेळी हा फॅक्टर २.५७ निश्चित करण्यात आला होता. याचा अर्थ, कर्मचाऱ्याचा जुना बेसिक पगार २.५७ ने गुणून नवीन बेसिक पगार निश्चित केला गेला होता. आता ८व्या वेतन आयोगात हा फॅक्टर काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. फिटमेंट फॅक्टर निश्चित करताना महागाई, राहणीमानाचा खर्च आणि कुटुंबाच्या गरजा यांचा विचार केला जातो. यामध्ये डॉ. वॉलस आर. एक्रोय्ड यांच्या फॉर्म्युल्याचाही समावेश असतो.

किती वाढू शकतो फिटमेंट फॅक्टर?

वित्तीय फर्म अॅम्बिट कॅपिटलच्या अहवालानुसार, ८व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८३ ते २.४६ दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सध्याचे किमान बेसिक वेतन १८,००० असेल, तर या फॅक्टरनुसार ते कसे वाढेल.

फिटमेंट फॅक्टर अपेक्षित नवीन बेसिक पगार वाढीची टक्केवारी (अंदाजे)
१.८३ सुमारे ३२,९४० रुपये १४%
२.४६ सुमारे ४४,२८० रुपये ५४%
टीप: ५४% वाढ होण्याची शक्यता कमी आहे, कारण त्यामुळे सरकारवर प्रचंड मोठा आर्थिक बोजा पडेल.

नवीन ग्रेड पे नुसार संभाव्य पगार (अंदाजित)
८व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.९२ ते २.५७ दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. या आधारावर, वेगवेगळ्या ग्रेड पे नुसार नवीन पगारात मोठे बदल दिसू शकतात. खालील तक्त्यात अंदाजित नवीन पगार दर्शविला आहे, ज्यात बेसिक पगार, एचआरए, टीए, एनपीएस आणि सीजीएचएस यांचा समावेश आहे.

ग्रेड पे फिटमेंट फॅक्टर बेसिक (₹) नेट सॅलरी (₹)
१९०० १.९२ ५४,५२८ ६५,५१२
१९०० २.५७ ७२,९८८ ८६,५५६
२४०० १.९२ ७३,१५२ ८६,७४३
२४०० २.५७ ९७,९१७ १,१४,९७५
४६०० १.९२ १,१२,५१२ १,३१,२१३
४६०० २.५७ १,५०,६०२ १,७४,६३६
७६०० १.९२ १,५३,९८४ १,८२,०९२
७६०० २.५७ २,०६,११४ २,४१,५१९
८९०० १.९२ १,८५,४७२ २,१७,९८८
८९०० २.५७ २,४८,२६२ २,८९,५६९

फायदा कधी मिळणार?

न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील ८वा वेतन आयोग येत्या सुमारे १८ महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. या अहवालात कर्मचाऱ्यांचे वेतन, बेसिक पे, फिटमेंट फॅक्टर आणि इतर भत्त्यांसंबंधी शिफारसी असतील. कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यावर हे बदल लागू होतील. या बदलांमुळे देशातील सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.