शेख हसीनांना मृत्यूदंड : बांगलादेशने भारताकडे केली त्यांना सोपवण्याची मागणी, मोदी सरकारने दिले 'हे' उत्तर
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल या दोघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
हे दोघेही सध्या भारतात राहत आहेत. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, या निर्णयानंतर बांगलादेशने भारताकडून शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. याला उत्तर देताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं. "बांगलादेशच्या न्यायाधिकरणानं शेख हसीना यांच्याबाबत दिलेल्या निकालाची जाणीव आहे," असं भारतानं म्हटलं आहे."जवळचा शेजारी म्हणून, भारत बांगलादेशच्या लोकांच्या हितासाठी वचनबद्ध आहे. त्यात शांतता, लोकशाही, समावेशकता आणि स्थिरता यांचा समावेश आहे. या दिशेनं भारत नेहमीच सर्व भागधारकांशी संवाद साधेल," असं मंत्रालयाने स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.