मंदिरात जाताच अवघ्या पाच मिनिटांत चोरीला गेले १६ हजारांचे शूज, संतापलेल्या इंजिनिअरला पुजाऱ्याकडून मिळाले 'हे' उत्तर
बेंगळुरूमधील प्रसिद्ध गणेश मंदिरातून एक विचित्र बातमी समोर येत आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचे ब्रँडेड बूट मंदिरात प्रवेश केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत चोरीला गेले. ज्यामुळे इंजिनिअरने पोलिस तक्रार दाखल केली. चोरी झालेल्या बूटांची किंमत अंदाजे १६,००० रुपये इतकी आहे. तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की तो संध्याकाळी ७:२० च्या सुमारास मंदिरात आला आणि प्रार्थना करण्यासाठी त्याचे बूट बाहेर सोडले. अवघ्या पाच मिनिटांत दर्शन पूर्ण करून तो बाहेर आला तेव्हा त्याला त्याचे बूट गायब असल्याचे आढळले.
सामान्य घटना
मंदिरातून आपले बूट चोरीला गेले आहेत हे पाहून इंजिनिअरला हादरा बसला. त्यालामंदिरातील पुजारी आणि इतर भाविकांकडून माहिती मिळाली की ही एक सामान्य घटना आहे. पुजाऱ्याचे स्वतःचे बूट दोनदा चोरीला गेले आहेत आणि इतर अनेक भाविकांनीही त्यांचे बूट चोरीला गेल्याची तक्रार केली आहे असे त्याला सांगण्यात आले. पण आतापर्यंत कोणीही पोलिस तक्रार दाखल केलेली नाही.
पोलिसांना विनवणी
तक्रारदाराने सांगितले की तो या चोरीकडे दुर्लक्ष करू इच्छित नव्हता. त्याने पोलिसांना चोरीचा गुन्हा नोंदवण्याची विनंती केली. मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर अनवाणी येताना अन् भक्त असल्याचे भासवून आणि बूट घेऊन जाताना कैद झाला.
आधीच्या चोराने काय सांगितले?
पोलिसांनी गुन्हा दाखल करून बूटांचा शोध सुरू केला आहे. पहिल्या अटक केलेल्या बूट चोरांनी सांगितले की ते दारू खरेदी करण्यासाठी चोरीचे बूट २०-५० रुपयांना विकतात.तक्रारदार इंजिनियर म्हणाला की, "जर लहान चोरीकडे दुर्लक्ष केले तर तेच लोक मोठ्या चोरी करतील. अशा लोकांना धडा शिकवणे आणि त्यांना सुधारणे महत्वाचे आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.