Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मांसाचे तुकडे, रक्त आणि...मुंबईजवळील लोकप्रिय पर्यटनस्थळी अमावस्येच्या रात्री अघोरी पूजा; निवडणुकीशी काय संबंध?

मांसाचे तुकडे, रक्त आणि...मुंबईजवळील लोकप्रिय पर्यटनस्थळी अमावस्येच्या रात्री अघोरी पूजा; निवडणुकीशी काय संबंध?


महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याचदरम्यान एकिककडे विजयासाठी काही पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र काही अनपेक्षित घटना हादरवून सोडत आहेत.

काही दिवसांपूर्वीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घराबाहेर उतारा आणि तत्सम प्रकार आढळून आला, त्यानंतर आता महाराष्ट्रातील; त्यातही मुंबईपासून काहीच अंतरावर असणाऱ्या अनेकांच्याच आवडीच्या पर्यटनस्थळीसुद्धा असाच प्रकार पाहायला मिळाला आहे. ज्यामुळं सध्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

कुठे घडलाय अघोरी पूजेचा प्रकार?
19 नोव्हेंबर 2025 रोजी अमावास्येच्या रात्री माथेरान इथं स्मशानभूमीत अघोरी पूजा झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. नगरपालिका कर्मचारी विजय चव्हाण हे अंतिम संस्कार स्थळाची तयारी पाहण्यासाठी स्मशानभूमीत आले असता त्यांनी हा प्रकार पाहिला. जिथं त्यांना घटनास्थळी लाल भोपळे, सुरी, त्यावर ठोकलेल्या अगरबत्त्या, दोन मोठी मडकी, लहान बकऱ्याचं मुंडकं , मांसाचे तुकडे आणि रक्त सांडलेले दिसून आलं आणि पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या दोन खड्ड्यांमध्येही काहीतरी विधी करून ठेवलेले असल्याची माहिती विजय चव्हाण यांनी दिली. त्यांनी तातडीनं घडल्या प्रकरणाची माहिती पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला दिली. ज्यानंतर इथं रात्र सरून जाताना कोणीतरी अघोरी विधी केल्याचा प्राथमिक कयास लावण्यात आला. दरम्यान, माथेरानमध्ये सध्या निवडणूक काळ सुरू असल्याने हा प्रकार काळी जादू करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या प्रयत्नाखातर केला जाऊ शकतो असाही संशय नागरिकांच्या मनात घर करत आहे. तेव्हा आता याप्रकरणी तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल.
अजित पवारांच्या घरासमोर नेमकं काय घडलं होतं?

अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर अंधश्रद्धेचा विचित्र प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला. जिथं त्यांच्या बारामतीमधील घरासमोर उतारा आढळून आला होता. हा सारा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सहयोग निवास असून इथंच उतारा आढळून आला. प्राथमिक स्वरुपाह इथं अघोरी पूजा करून भानामतीचा प्रकार घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.