Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"चिखलात कमळ असत पण राज्यात ते."; शिवसेनेच्या प्रवक्ताच्या पोस्टने खळबळ म्हणाले "भगव्याची शक्ती यांसमोर."

"चिखलात कमळ असत पण राज्यात ते."; शिवसेनेच्या प्रवक्ताच्या पोस्टने खळबळ म्हणाले "भगव्याची शक्ती यांसमोर."


गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप यांच्यात अंतर्गत धुसफूस असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. या चर्चा होण्यामागे अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये झालेले पक्ष प्रवेश. यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री मंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस-शिंदे यांच्यातही अबोला असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून दिसत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्यांने भाजपचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका या पोस्टमधून केली आहे. शिवसेना प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांनी फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी "चिखलात कमळ असत… पण राज्यात ते गटरात रुतलेलं होतं, तेव्हा जनतेच्या सेवेसाठी कोणी बाहेर काढलं? हे काही लोक लवकर विसरतात." असा टोला लगावला आहे. या पोस्टमुळे भाजप-शिवसेनेते राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

राजकारणात आरोप-प्रत्यारोप सोपे आहेत, पण जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करून राज्याला स्थैर्य देणे हे शिंदे यांचे काम! शिंदेंविरोधात लढणे म्हणजे वादळाविरुद्ध मशाल पेटवणे, मशालीने स्वतःच जळून जाल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. जनतेचा आशीर्वाद, विकासाची गती आणि भगव्याची शक्ती यांसमोर विरोधकांचे राजकारण फक्त धुरकट कुजबुज! असे म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

फडणवीस-शिंदेंमध्ये अबोला?

मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसनव्यवस्थेत काही खर्च्यांचे अंतर ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. अमृता फडणवीस यांच्या 'दिव्यज फाऊंडेशन' आयोजित कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र त्यांच्यात संवाद झाला नाही. यामुळे दोघांमध्ये अबोला निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण
कार्यक्रमात फडणवीस आधीच स्थानापन्न झाले होते. त्यानंतर शिंदे आले. फडणवीसांनी उभे राहून त्यांना नमस्कार केला आणि बाजूला बसण्याचा हात केला. शिंदेंनीही उपस्थित व फडणवीसांना नमस्कार केला, पण त्यांनी फडणवीसांच्या बाजूच्या दोन खुर्च्या सोडून अंतरावर बसणे पसंत केले. या दोन मोकळ्या खुर्च्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासाठी राखीव होत्या. तरीही, दोन नेत्यांमधील हे अंतर राजकीय चर्चेला पुन्हा तोंड फोडणारं ठरले होते. याबाबत आता मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण देत खुलासा करत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे सांगितले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.