Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पार्थ पवारांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा; आंबेडकरी संघटना आक्रमक

पार्थ पवारांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा; आंबेडकरी संघटना आक्रमक


मुंबई : कोरेगाव पार्क येथील महार वतन जमीन खरेदी व्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार अडचणीत सापडला आहे. या जमीन व्यवहारामध्ये अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पार्थ पवारांना वळगत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
मात्र अमेडिया कंपनीची 99 टक्के भागीदारी असूनही पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये का नमूद करण्यात आले नाही? तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही राजीनामा का घेण्यात आला नाही, असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात आहेत. ही जमीन महार वतनाची असल्याने आता आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. ऑल इंडिया पँथर सेना तसेच भीम आर्मी आक्रमक झाली आहे. दीपक केदार यानी महार वतनाच्या जमिनीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभा करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ऑल इंडीया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना जी भूमिका घेतली त्यासाठी त्यांना लाज वाटली पाहिजे होती. आम्हाला वाटले होते की या पत्रकार परिषदेत अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्रीपदावरून बाजूला होतील. मात्र, शेवटी ही दलितांची जमीन आहे, हे काय करणार? अशी त्यांची आजची भूमिका होती. असे ते म्हणाले.

ते म्हणाले, पार्थ पवार यांच्यावर का गुन्हा दाखल होत नाही? हे आम्हाला सांगावे. अजित पवार यांनी टोलवाटोलवीची भूमिका घेतली आहे. त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. दुसऱ्यांना धमक्या देऊन आपल्या मुलाला वाचवण्याचा हा प्रयत्न होतोय. याविरोधात आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार. राज्यातील महार वतनाच्या जमिनींसाठी आम्ही लढा देणार आहे. अस त्यांनी सांगितले. तसेच, या व्यवहारातील जमीन ही महार वतनाची जमीन आहे. ती लुटण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. असे दीपक केदार म्हणाले.

कोरेगाव पार्क येथील महार वतन जमीन खरेदी व्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार अडचणीत सापडला आहे. या जमीन व्यवहारामध्ये अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारातील जमीन ही महार वतनाची जमीन आहे. पार्थ पवार, संबंधित महसूल अधिकारी आणि प्रसाशकीय अधिकारी यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा अशी मागणी भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे यांनी देखील केली आहे. भीम आर्मीच्या वतीने चिराग नगर घाटकोपर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.

महार वतन जमीन म्हणजे महाराष्ट्रातील एक विशिष्ट प्रकारची जमीन आहे, जी पूर्वीच्या काळात महार समाजातील लोकांना त्यांच्या वंशपरंपरागत शासकीय आणि गाव पातळीवरील सेवांच्या मोबदल्यात देण्यात आली होती. ही वतन पद्धत प्रामुख्याने ब्रिटिश काळात, बॉम्बे हेरिडेटरी अ‍ॅक्ट 1874 (Bombay Hereditary Act, 1874) नुसार अस्तित्वात होती. तसेच महार समाजातील लोकांना गावाच्या सीमांचे रक्षण करणे, महसूल गोळा करण्यात मदत करणे, सरकारी अधिकाऱ्यांसाठी काम करणे आणि इतर गावकामगार (जसे की बारा बलुतेदारांप्रमाणे) म्हणून सेवा देणे, यासारख्या कामांसाठी ही जमीन मोबदला (पारिश्रमिक) म्हणून दिलेली असे. महत्त्वाचे म्हणजे जमीन धारक व्यक्तीला ही जमीन कसायची परवानगी होती, परंतु ही जमीन वंशपरंपरागत आणि अविभाज्य शर्तीवर (Non-transferable) दिलेली होती. याचा अर्थ जोपर्यंत सेवा चालू आहे, तोपर्यंत जमीन तुमच्या कुटुंबाकडे राहील, पण तिची विक्री किंवा हस्तांतरण करता येत नव्हती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.