Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणेकरांची महत्वाची बातमी! यापुढे संध्याकाळी ७ नंतर पेट्रोल पंप राहणार बंद; नेमकं कारण काय?

पुणेकरांची महत्वाची बातमी! यापुढे संध्याकाळी ७ नंतर पेट्रोल पंप राहणार बंद; नेमकं कारण काय?


पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात यापुढे संध्याकाळी सातनंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सतत हल्ले होत आहेत. याच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोल पंप असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

पुण्यामध्ये गेल्या ७ दिवसांत कर्मचाऱ्यावर तीन हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना वाढत चालल्यामुळे आता पेट्रोल डीलर्स असोसिएशनने संध्याकाळी सातनंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुणे पोलिस प्रशासनाला पत्र पाठवले होते. कठोर कारवाई केली नाही आणि ठोस पाऊलं उचलली गेली नाही तर पेट्रोप पंपाची सेवा वेळेत बदत करू असा इशारा देण्यात आला आहे. 

पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पेट्रोल पंप असोसिएशनने पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था सुधारण्याबाबत ठोस पावलं उचलावीत नाही तर सेवा वेळेत बदल करण्यावाचून पर्याय राहणार नाही. पेट्रोल डिलर्स असोसिएशनने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आणि ग्रामीण पोलिस अधीक्षकांना हे पत्र पाठवले होते.

पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी सांगितले की, 'पुण्यामध्ये पेट्रोल पंप चालक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात अमितेश कुमार यांना पत्र पाठवले आहे. जर योग्य कारवाई केली नाही आणि गुंडांना आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवू. त्यानंतर एक थेंबही पेट्रोल मिळणार नाही असे आम्ही त्यांना सांगितले होते. पण पेट्रोल पंप अत्यावश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही. अमितेश कुमार हे सक्षम अधिकारी आहेत. आम्हाला आशा आहे की ते यावर तोडगा काढतील आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि चालकांना संरक्षण देतील अशी आम्हाला आशा आहे.'



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.