Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बनावट नोटांवर कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी थोपटली महात्मा गांधी चौक पोलिसांची पाठ !

बनावट नोटांवर कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी थोपटली महात्मा गांधी चौक पोलिसांची पाठ !


कोल्हापूर येथील चहाच्या दुकानात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या बाजारात खपवण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांची पाठ पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी थोपटली. 
या कारवाईबद्दल पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह टीमला प्रशास्तिपत्र, रिवार्ड देऊन बुधवारी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत गौरवण्यात आले. बनावट चलनी नोटा बनवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर व कंपनीवर कोल्हापूर, मुंबई येथे जावून महात्मा गांधी चौक पोलिसांनी प्रभावी कारवाई केली होती. या प्रकरणात कोल्हापूर येथील एका पोलिसासह 09 जणांना शिताफीने अटक केली होती. 
या कामगिरीसाठी याआधी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनीही महात्मा गांधी चौक पोलिसांना प्रशास्तिपत्र दिले होते. आज सांगली पोलीस मुख्यालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्हा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह सर्व टिमला प्रशस्तीपत्र व रिवार्ड देऊन गौरवले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.