Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना दारू पिणाऱ्यांना पुन्हा दणका एसएस बियर शॉपीच्या मालकासह 19 तळीरामांचा समावेश : विश्रामबाग पोलीस, राज्य उत्पादन शुल्कची संयुक्त कारवाई

सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना दारू पिणाऱ्यांना पुन्हा दणका एसएस बियर शॉपीच्या मालकासह 19 तळीरामांचा समावेश : विश्रामबाग पोलीस, राज्य उत्पादन शुल्कची संयुक्त कारवाई


बिअर शॉपीच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी विना परवाना दारू पिणाऱ्या तळीरामांसह बियर शॉपीच्या मालक अशा 19 जणांवर कारवाई करण्यात आली. विश्रामबाग पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्कच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.

सुनिलकुमार बेचेन सहानी, अभिनाश गणेश सहानी, राजु अशोक मराते, मल्लु मंदेश्वर सहानी, कृष्णाकुमार रामचंद्र सहानी, नाथा लक्ष्मण चंदणशिवे, आनंद रामचंद्र पुणेरी, जगदीश वंसत माने, दिपक आण्णसाहेब पाटील, आसिफ अब्दुल मुल्ला, निखील नंदकुमार कोरे, निखील सुरेश कांबळे, दत्तात्रय ज्ञानु पवार, नंदु शामराव जाधव, आमीर पैगंबर गवंडी, राहुल बापुसो चौगुले, शशिकांत जयवंत चाणी, चैतन्य अजित खघाटे, संजय सुद्दाम सर्वेदे (हॉटेल एसएस मालक) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. येथून पुढेही जिल्ह्यात अशा संयुक्त कारवाया सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले. विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, राज्य उत्पादन शुल्कचे मिरजचे निरीक्षक दीपक सुपे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांचन, पोलीस उपनिरक्षक सुजाता भोपळे, प्रशांत माळी, महमद मुल्ला, शुभांगी मुळीक, राज्य उत्पादन शुल्क कडील विनायक खांडेकर, स्वप्नील आटपाडकर, शाहीन शेख, कविता सुपने, स्वप्नील कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.