Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपा जैन प्रकोष्ठ राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या कोल्हापूर दौऱ्यात पक्षकार्याला चालना

भाजपा जैन प्रकोष्ठ राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील 
यांच्या कोल्हापूर दौऱ्यात पक्षकार्याला चालना


कोल्हापूर दि.— भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी कोल्हापूर / जयसिंगपूर संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने भाजप जिल्हा कार्यालयाला भेट देऊन संघटनात्मक घडामोडींवर पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. बैठकीचे प्रास्ताविक जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रशांत गोंडाजे  यांनी केले. त्यानंतर कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष महावीर तकडे  यांनी जैन प्रकोष्ठ कोल्हापूर विभागातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

मार्गदर्शन करताना रावसाहेब पाटील म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा देशातील असा एकमेव राजकीय पक्ष आहे, ज्याने जैन अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र प्रकोष्ठ स्थापन करून त्यांना राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जैन समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या जैन आर्थिक विकास महामंडळा मार्फत गरीब, गरजू बांधवांना अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि विविध कल्याणकारी योजनांचा थेट फायदा होणार आहे .”

तसेच त्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या महामंडळासाठी शंभर कोटी रूपयांच्या निधीची मागणी केल्याचे सांगितले.
बैठकीत बोलताना भाजपा कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री नाथाजी पाटील यांनी, “गेल्या 21 वर्षांपासून मी पक्षाच्या विविध स्तरांवर काम करत आलो आहे. आज जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना, हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याची जाणिव अधिक ठळकपणे होते,” असे नमूद केले. तसेच जिल्हा सचिव डॉ. आनंद गुरव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजप जैन प्रकोष्ठ संघटन अधिक बळकट करण्यासाठी पुढील काळात व्यापक संपर्क अभियान राबविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.
 या दरम्यान जयसिंगपूर येथे रावसाहेब पाटील यांना सहकार आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शंकर बिराजदार यांनी श्री रावसाहेब पाटील यांचा सत्कार केला
या वेळी भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष किरणसिंह घाटगे (सरकार), कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजीत पवार, शिरोळ तालुका जैन प्रकोष्ठ अध्यक्ष राजगोंडा पाटील, प्रकोष्ठचे माजी जिल्हाध्यक्ष जयपाल काने कोल्हापूर जिल्हा सचिव भाजपा जैन श्री सुदर्शन पाटील. कोल्हापूर पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री सुनील कापसे. तसेच वळिवडे ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत दिगंबरे, सुहास पाटील, कुलभूषण चौगुले, महावीर पाटील सुरज  अथने श्री स्वप्निल मुरगुडे श्री रणजीत पाटील श्री विशाल पाडळकर श्री सुमित जकाते श्री मनोज व्हराटे उपसरपंच राहुल पाटील, तसेच श्रेयांश खोत, रोहित पाटील, सम्मेद खोत चिंचवाडचे माजी उपसरपंच धन्यकुमार पाटील उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.