Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली:- आणखी एक सामाजिक बहिष्काराचा प्रकार; पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून..

सांगली:- आणखी एक सामाजिक बहिष्काराचा प्रकार; पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून..


सांगली : झोपडी बांधताना विरोध केला म्हणून शिवीगाळ, मारहाण झाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून पारधी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा धक्कादायक प्रकार मिरज तालुक्यातील एका गावात समोर आला. पिडीतांना गावात दळपासाठी गिरण बंदी बरोबरच पाणी बंद करण्यात आले. पारधी समाजाचे कुटुंब असल्याने आमच्यावर गावात सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला असल्याची तक्रार शिंदेवाडी (ता. मिरज) येथील एका महिलेने केली आहे. या प्रकरणी गावच्या सरपंच, उपसरपंचासह १२ जणाविरूध्द मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उप अधिक्षक प्रणिल गिल्डा यांनी बुधवारी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.


पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार गावातील जलकुंभाजवळ झोपडी बांधत असताना संशयितापैकी एकाने अटकाव केला. तू या ठिकाणी झोपडी बांधू शकत नाहीस असे म्हणत डोकीचे केस ओढून ही जागा तुझ्या बापाची आहे का असा सवाल केला. शिवीगाळ करत ढकलून दिले. दि.२ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या मारहाणीची व शिवीगाळ प्रकरणी पोलीस ठाण्यात दि. ४ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. माजी सरन्यायाधीश गवईंच्या आईने पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर हात ठेवले; मोदी म्हणाले, "मला आशीर्वाद द्या की…"
पोलीस ठाण्यात तक्रार का केली या कारणावरून गावातील प्रमुख मंडळींनी सामाजिक बहिष्कार टाकला आहे. यामुळे पिडीत महिला व तिचे कुटुंब पारधी समाजाचे आहे म्हणून कोणाही गावकर्‍यांनी मदत करू नये असे एका संशयित आरोपींने सागितले आहे. यामुळे गावात दूध डेअरीमध्ये दूध घालण्यात या कुटुंबातील सदस्य गेले असता दूध स्वीकारण्यात आले नाही, तसेच गिरणी चालकांने दळप दळून देण्यास नकार दिला. पिण्यास पाणीही बंद करण्यात आले. गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उप सरपंच यांच्यासह १२ जणांनी आम्हाला दैनंदिन गरजेच्या वस्तूपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार संबंधित तक्रारदार महिलेने केली आहे.

याबाबत उप अधिक्षक श्री. गिल्डा यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणी गावपातळीवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक प्रकरणाचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहेत. संशयिताविरूध्द सामाजिक बहिष्कार व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास ते स्वत: करत आहेत.
भटका समाज अशी ओळख असलेल्या पारधी समाजातील कुटुंबांचे शासनाने पुनर्वसन दहा वर्षापूर्वी केले. प्रत्येक गावात एक कुटुंब असे पुनर्वसन करण्यात आले. मात्र बहुतांश वेळा या कुटुंबात अन्य ठिकाणी वास्तव्य असलेले या समाजातील लोक वास्तव्यास येतात. या परगावाहून आलेल्या व्यक्तींकडून गावात चोऱ्या होत असल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे. उभ्या पिकाची कणसे खुडून नेणे, वैरण लांबवण्यासारखे प्रकार घडतात असा लोकांचा समज आहे. यातूनच त्यांच्या वास्तव्याला विरोध होत असल्याचे सांगण्यात आले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.