संविधान दिन साजरा; संविधान दिनानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण
सांगली, दि. २६ नोव्हेंबर : भारतीय संविधान दिनानिमित्त आज सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने झाली. उपस्थित मान्यवर व नागरिकांनी भारतीय संविधानाची मूल्ये, विचार आणि समतेचा संदेश समाजात पोहोचवण्याची प्रतिज्ञा केली. डॉ. आंबेडकर यांनी रचलेल्या संविधानामुळे देश एकसंघ, सक्षम आणि लोकशाही मार्गावर वाटचाल करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचे महत्व अधोरेखित केले. नागरिकांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर आधारित समाजघडणीची शपथ घेत संविधानप्रेम व्यक्त केले. संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साह, अभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.या कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मोरे, जिल्हा सचिव रूपाली अडसूळ, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सांगली शहर जिल्हाध्यक्ष सुजित काटे, भाजपा सांगली पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, स्नेहजा जगताप, भाजपा अनुसूचित जाती कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सचिव आम्रपाली कांबळे, तसेच कार्यकर्ते कुणाल संकपाळ, राजू मद्रासी, संदीप कुकडे, अजय कांबळे, किरण कपाले, मनोज सूर्यवंशी, अभिजीत कुकडे, राजू वायदंडे, उदय बेलवलकर, राजू पठाण, आदी पदाधिकारी,मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.