Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या? दाव्याने जगात खळबळ!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या? दाव्याने जगात खळबळ!


पाकिस्तान हा असा देश आहे, जिथे नेहमी काहीतरी घडत असते. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना रसद पुरवली जाते. परंतु याच पाकिस्तानमध्ये सध्या अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या सरकारमध्ये तेथील लष्कराचा हस्तक्षेप आणि यातून समोर होणारा विध्वंस यामुळे पाकिस्तानात नेहमीच हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येतात. असे असतानाच आता संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या झाल्याचा दावा केला जातोय. तशी अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे. पाकिस्तानी सरकार आणि तुरुंग प्रशासनाने संगनमत करून इम्रान खान यांचा छळ करून त्यांची हत्या केल्याचा दावा केला जातोय.

नेमकी काय माहिती समोर आली?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे 2023 सालापासून रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात कैद आहेत. सध्या मात्र त्यांची तुरुंगात हत्या केल्याची अफवा पसरली आहे. पाकिस्तानी लष्कर आमि जेल प्रशासनाकडून त्यांचा छळ केला जातोय. त्यांना कोणालाही भेटू दिले जात नाहीये. त्यामुळेच इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवेला बळ मिळाले आहे. मंगलवारी रात्री (25 नोव्हेंबर) इम्रान खान यांच्या बहिणी नोरीन खान, अलिमान खान, उजमा खान यांना तुरुंग परिसरातून फरफटत बाहेर काढण्य्त आले. त्यांना मारझोडही करण्यात आल्याचा दावा केला जातोय. परंतु इम्रान खान यांना कोणालाही भेटू दिले जात नाहीये. त्यामुळेच इम्रान खान यांची हत्या केल्याची अफवा पसरली आहे.

पीटीआयचे कार्यकर्ते आक्रमक

पाकिस्तानात इम्रान खान यांची हत्या करण्यात आल्याचा दावा काहीजण करत आहेत. या दाव्यामुळे पाकिस्तानत संगळीकडे खळबळ उडाली आहे. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. इम्रान खान जिवंत असतील तसेच त्यांना काहीही झालेले नसेल तर मग त्यांच्याशी कोणालाही भेटू का दिले नाहीये? असा सवाल पीटीआयच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर नेटकरी पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर सडकून टीका करत आहेत.

दाव्याची पुष्टी अद्याप झालेली नाही
इम्रान खान यांच्या हत्येचा दावा एक्सवरील मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स बलुचीस्तान नावाच्या खात्यावरदेखील इम्रान खान यांच्या हत्येचा दावा करण्यात आलाय. ऑगस्ट 2023 पासून इम्रान खान हे तुरुंगात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी सरकारने इम्रान खान यांना कोणालाही न भेटू देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळेच इम्रान खान यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. काहीजण इ्रमान खान यांची हत्या झाल्याचाही दावा करत आहेत. हा दावा खरा असल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.