Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!


मोखाडा : मोखाडा तालुक्यातील आमला गावाचे माहेर असलेल्या सविता बांबरे (20) या प्रसूत महिलेला अर्ध्यावर रस्त्यात, गावाच्या दोन किलोमीटर मागे रुग्णवाहिका चालकाने सोडले. त्यामुळे दोन दिवसाच्या बाळाला हातात घेऊन प्रसूत सविताला अभयारण्यातून दोन किलोमीटर पायपीट करत घर गाठावे लागले आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशील कारभारावर टीकेची झोड ऊठली आहे. मोखाड्यातील केवनाळे येथील सविता बांबरे (20) या आदिवासी महिलेला 19 नोव्हेंबर ला प्रसूतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सुखरूप प्रसूतीसाठी तिला जव्हारच्या ऊपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिची प्रसूती सुखरूप झाली. 
रविवार 23 नोव्हेंबर ला तिला रुग्णवाहिका देऊन घरी पाठविण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका चालकाने त्यांना गावापासून दोन किलोमीटर रस्त्यावर उतरवून रुग्णवाहिका निघून गेला. त्यामुळे सविताला ताणसा अभयारण्यातील आमला गावात पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे. प्रसूत सविता बारात हिच्या सोबत आई व सासूबाई होत्या. या घटनेचा व्हिडीओ आमल्यातील राजु सोमा बारात या नागरिकाने काढुन समाजमाध्यमाद्वारे सर्वत्र प्रसारीत केला. त्यामुळे मोखाडात खळबळ ऊडाली आहे. आदिवासी माणसांनी असेच जगायचे आणि मरायचे का ? असा संतप्त सवाल राजु बारातने या व्हिडीओ तुन केला आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशील कारभारावर नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेविषयी सविता बांबरे यांनी जव्हार हुन केवनाळे येथे जाण्यासाठी 102 क्रमांकाची रूग्णवाहीका बुक केली होती. मात्र, त्यांनी सुर्यमाळ येथे आल्यानंतर आमले येथे जाण्यासाठी चालकाकडे आग्रह धरला. चालकाने त्यांना आमला गावाच्या फाट्यानजीक नेले, तेथे त्याला आम्ही येथुन पायी घरी जाऊ, असे सांगितल्याची माहीती रूग्णवाहीका चालकाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्याचे, तालुका वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी सांगितले आहे. बाळ आणि प्रसूत महिलेची तब्येत स्थिर असल्याचेही चत्तर यांनी सांगितले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.