Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निकालाआधीच तेजस्वी यादव यांचा मोठा गौप्यस्फोट, 'दिल्लीतून मतमोजणीवेळी...'

निकालाआधीच तेजस्वी यादव यांचा मोठा गौप्यस्फोट, 'दिल्लीतून मतमोजणीवेळी...'


बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. मात्र, या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महागठबंधनचे नेते, मुख्यमंत्रि‍पदाचे उमेदवार तेजस यादव यांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तेजस्वी यादव म्हणाले, पटणामधून, मुख्यमंत्री निवासातून, दिल्लीतून अधिकाऱ्यांना फोन येत आहे. मतमोजणी हळूहळू (स्लो) करण्याचे निर्देश देत आहे. विशेष करून जेथे महागठबंधन जिंकत आहे तेथे या सूचना करण्यात आल्या आहे. तसेच महागठबंधन जेथे जागा जिंकेल ती घोषिक करू नका. एनडीएची जागा विजयी घोषिक करा, असे देखील निर्देश देण्यात आले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मतमोजणी चालू असतानाचा पंतप्रधान भाजप कार्यालयाकडे जात आहे असे मीडियामध्ये दाखवून वातावरण निर्मिती केली जाणार आहे. भाजप जिंकत आहे, असे चित्र निर्माण केले जाणार आहे. मात्र, भाजपवाले आतून घाबरले आहेत ते पराभूत होत आहे. महागठबंधन जिंकत आहे. दिल्लीतील दबंग मंत्री फोन करून अधिकाऱ्यांना निर्देश देत आहे.

अधिकाऱ्यांच्या हवाल्यानेच आम्हाला माहिती मिळत आहे की त्यांना फोनद्वारे मतमोजणी दरम्यान काय करायचे याचे निर्देश दिले जात आहे. दरम्यान, कोठेही 2020 वाली चूक प्रशासनाने केली, गैरसंवैधानिक काम केले तर जनता एका पायावर उभी आहे ती करारा जवाब देईल. 

जे अधिकारी प्रमाणिकपणे काम करत आहेत त्यांना घाबरण्याची गरज नाही. पण जर कोणाच्या इशाऱ्यावर काम करत असाल तर नक्की विचार करा. जनतेने मतदान केले आहे. त्यांच्यासोबत न्याय झाला पाहिजे. मी अधिकाऱ्यांना सांगतो की निष्पक्षपणे काम करा.
आम्ही सरकार बनवतोय...

तेजस्वी यादव म्हणाले, आम्ही सरकार बनवत आहोत. 2020 च्या तुलनेत 80 लाख नागरिकांना जास्त मतदान केले आहे. भाजपचे लोक घाबरले आहेत, बैचैन आहेत. त्यांना माहिती आहे की बिहारमधून एनडीएची सत्ता जात आहे, त्यांचे सरकार जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.