Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नांद्रे गावाच्या विकासाला मोठी चालन ामहत्वाकांक्षी विकासकामांसाठी तब्बल २ कोटींचा निधी मंजूरआमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला शासनाची दाद

नांद्रे गावाच्या विकासाला मोठी चालना महत्वाकांक्षी विकासकामांसाठी तब्बल २ कोटींचा निधी मंजूर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला शासनाची दाद


सांगली:  सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल रु. २ कोटींचा विशेष निधी मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे. सांगली विधानसभेचे आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून, गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत विकासकामांना आता गती मिळणार आहे.

५२ वर्षांनंतर नांद्रे येथे भव्य पंचकल्याण प्रतिष्ठान महामहोत्सव
नांद्रे गावात जैन धर्मियांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा पंचकल्याण प्रतिष्ठान महामहोत्सव २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या ऐतिहासिक महोत्सवासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या तयारीसाठी गावातील रस्ते, चौक, आणि इतर मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याची तातडीची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. यावर आमदार सुधीरदादांनी तातडीने कारवाई करत ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन सादर केले व समक्ष भेटून निधीची मागणी केली.

ग्रामस्थांच्या अपेक्षा आणि महोत्सवाच्या महत्त्वाचा विचार करून शासनाने तातडीने रु. २ कोटींचा विकासनिधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून— • रस्त्यांचे डांबरीकरण • मुख्य चौकांचे सुशोभीकरण • गावातील प्रलंबित मूलभूत सुविधा कामे • महोत्सवा साठी आवश्यक सुविधांचे उन्नतीकरण या सर्व कामांना आता गती मिळणार आहे.निधी मंजुरीची माहिती मिळताच गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी हे “दीर्घकाळाची प्रतीक्षा संपली” असे समाधान व्यक्त केले. पंचकल्याण समिती, ग्रामपंचायत आणि सर्व नागरिकांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे मनापासून आभार मानले आहेत.प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकासकामांना लवकरच प्रारंभ होणार असून, कामे दर्जेदार आणि वेगवान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.